Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे

ग — गणेशा, Tue, 04/12/2011 - 11:45
बंद ओठ बंद कान मनही बंद का हो? न्याय मिळेल का येथे एक जीव किंचाळत आहे सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे गवताची पाती सजली या भयाण राती काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे का लढवय्या आता बदनाम होत आहे पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा धाक आहे यल्गाराचा आता दबला आवाज येथे खोट्यांचाच येथे चित्कार आहे ------ शब्दमेघ

प्रतिक्रिया द्या
1359 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 04/12/2011 - 12:07 नवीन
क्या बात... क्या बात..... जीवघेणी रचना आहे......
का लढवय्या आता बदनाम होत आहे पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा धाक आहे यल्गाराचा आता दबला आवाज येथे खोट्यांचाच येथे चित्कार आहे
संपलो....
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 04/12/2011 - 12:20 नवीन
अतिशय भन्नाट रचना.. आहाहा.. मस्त गणेशा.. चेंडु उंच फटका मारून दर्शकां कडे भिरकावण्यात आलेला आहे.. :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Tue, 04/12/2011 - 12:45 नवीन
गणेशा -अति उत्तम सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे गवताची पाती सजली या भयाण राती काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे हे खूप आवडले .खूप शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
A
ajay wankhede Tue, 04/12/2011 - 13:31 नवीन
व्वा. गुरु़ जि जबरदस्त
  • Log in or register to post comments
ब
बन्या बापु Tue, 04/12/2011 - 21:37 नवीन
जबरदस्त
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/13/2011 - 15:35 नवीन
तुमच्या रचनांमध्ये मला सगळ्यात आवडलेली रचना. अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ गुरुवार, 04/14/2011 - 08:17 नवीन
मस्तच...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा