Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा नव्याने...

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Wed, 04/13/2011 - 07:49
प्रेरणा : हा प्रतिसाद पुन्हा नवा खेळ मांडूया पुन्हा अनोळखी होऊया पुन्हा नव्याने भेटूया चल पुन्हा नव्याने जगूया ओंगळ दु:खांना स्वछ पुसून गोजीर्‍या सुखांना गिरवूया जन्मांतरीचे आपले रेशमी नाते नवरंगाच्या धाग्यांनी सजवूया चल सखे................. सुंदर प्रेमाचे साजिरे रूप नव्याने एकवार लेवूया हुकलेल्या सार्‍या स्वप्नांना मनाच्या गाभार्‍यात रुजवूया चल सखे................... सोड आता हा समंजसपणा काही क्षण फिरून धुंद होवुया विसरुनी हा विरस शहाणपणा पुन्हा नव्याने कोवळे वेड पांघरुया |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१३/०४/२०११)

प्रतिक्रिया द्या
3320 वाचन

💬 प्रतिसाद (19)
र
रामदास Wed, 04/13/2011 - 07:51 नवीन
चाल लावायला देण्यासारखी कविता .
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 04/13/2011 - 08:20 नवीन
मस्तच.. :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 04/13/2011 - 08:30 नवीन
विसरुनी हा विरस शहाणपणा पुन्हा नव्याने कोवळे वेड पांघरुया या ओळी आवडल्या. दोन विचार: विरस च्या जागी निरस चांगलं वाटलं असतं का? ओळींमध्ये मात्रा कमीजास्त वाटतात. अवांतरः चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो या गाण्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Wed, 04/13/2011 - 15:13 नवीन
चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो या गाण्याची आठवण झाली.
हेच म्हणतो. छान कविता. विरस शब्द खटकतोच आहे पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
म
मृत्युन्जय गुरुवार, 04/14/2011 - 11:26 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
म
मी ऋचा गुरुवार, 04/14/2011 - 14:13 नवीन
+१ सुरेख कविता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
च
चित्रा Fri, 04/15/2011 - 12:46 नवीन
कविता आवडलीच. विरस ऐवजी वेगळा काही शब्द सुचला तर चांगले होईल याबाबतीत सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
निनाव Wed, 04/13/2011 - 09:46 नवीन
खूपच छान!! ओंगळ दु:खांना स्वछ पुसून गोजीर्‍या सुखांना गिरवूया जन्मांतरीचे आपले रेशमी नाते नवरंगाच्या धाग्यांनी सजवूया हे फारच सुंदर जमले आहे. आवडलेच.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 04/13/2011 - 17:23 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाव
प
प्राजु Wed, 04/13/2011 - 22:49 नवीन
अतिशय सुरेख कविता. खूप आवडली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/14/2011 - 05:57 नवीन
सुंदर... :) (प्रेमी) ;)
  • Log in or register to post comments
प
पियुशा गुरुवार, 04/14/2011 - 08:25 नवीन
अरे वा ! मस्तच यार :)
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 04/14/2011 - 11:19 नवीन
चान चान !!
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ गुरुवार, 04/14/2011 - 11:29 नवीन
छान कविता...:)
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार गुरुवार, 04/14/2011 - 13:15 नवीन
सुरेख !
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 04/14/2011 - 13:27 नवीन
झकास रे भावड्या
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 04/14/2011 - 13:43 नवीन
सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
प
पल्लवी मिंड Tue, 10/22/2013 - 12:37 नवीन
मस्त आहे कविता
  • Log in or register to post comments
प
पेस्तन काका Tue, 10/22/2013 - 13:01 नवीन
कविता हा आमचा प्रांत नाहि पण तुमच्या कविता वाचनिय असता :) परत एक अशीच सुंदर रचना
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा