पुनर्जन्म
हजारो वर्षापासुन पडुन होतो..
डोंगराच्या पायथ्याशि दगड बनून.
कुठुन अचानक आज एक शिल्पकार आला...
त्याचा हात लागताच माझा पुनर्जन्म झाला.
मनाचे सारेच बन्द कप्पे अलगत उघडत गेलेत..
जिवनाच्या कवितेला स्फुरण चढत गेले.
हजारो वर्षापासुन ओसाड वाटणारा निसर्ग ..
आज धुन्द करु लागला.
वसन्त,शरद्,ग्रिश्म्,श्रावण सारेच ऋतु ..
मनाला भावू लागलेत.
सुर्य, चन्द्र जणु माझे डोळे झालेत...
आता तर क्षितिजा पलिकडिल
जग हि दिसु लागले.
आता मि जगणार धुन्द्,मधहोश..
कारण आता माझा पुनर्जन्म झाला.
💬 प्रतिसाद
(5)
न
निनाव
Wed, 04/13/2011 - 22:01
नवीन
छान. विषय छान आहे. अजुन छान येउद्या. पुलेशु.
मधहोश = 'मदहोश'
अलगत = 'अलगद'
मि = 'मी'
लागलेत = 'लागले' *
आपल्या पुर्व आज्ञे शिवाय, पुन्हा रचून देत आहे.. शब्द तुमचेच आहे, कुठेही नवीन शब्द वापरले नाहिये मुळ काव्य टिकविण्यासाठी.
तुमच्या काव्यास एक अजब सुंदर लय आहे.. :
हजारो वर्षापासुन होतो पडुन ..
डोंगराच्या पायथ्याशि दगड बनून.
आला अचानक एक शिल्पकार ...
हात त्याचा लागताच
झाला माझा पुनर्जन्म
मनाचे सारेच बन्द कप्पे
गेले उघडत अलगद ..
जिवनाच्या कवितेला
गेले स्फुरण चढत
हजारो वर्षापासुन ओसाड
निसर्ग हा वाटणारा ..
करु लागला आज धुन्द
वसन्त,शरद्, श्रावण नि ग्रीष्म
ऋतु सारेच लागले भावू मनास
जणु डोळे माझे सुर्य नि चन्द्र
क्षितिजा पलिकडिल जग
दिसू लागले आहे मज
जगणार मी धुंद, मदहोश
झाला आहे माझा पुनर्जन्म!
- Log in or register to post comments
A
ajay wankhede
गुरुवार, 04/14/2011 - 08:03
नवीन
आभारी आहे...
always solicited...
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 04/14/2011 - 07:12
नवीन
दिल के तार छेड दिये आपने!!
मस्तच मुक्तक...
@ निनावः
अशी मांडणी जास्त छान वाटते.
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 04/14/2011 - 07:16
नवीन
पुनर्जन्माबद्दल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . तुम्हाला तुमचा नवा जन्म सुखाचा समृद्धीचा आणि आर्थिक भरभराटीचा जावो . तसेच आपली प्रकृती दिवसेंदिवस सुदृढ होत जावो .
- शुभेच्छुक , पै . टारझन
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 04/14/2011 - 11:02
नवीन
छान कविता .. आवडली एकदम ..
पुनर्जन्म.. कात टाकुन पुन्हा उठल्यावर तोच आधीचा ओसाड निसर्ग आणि सगळ्या गोष्टी ही आता खुप सुखावह वाटतात .. जीवनाचा नविन अर्थ समजावणार्या या पुनर्जन्माची तर आयुष्यात गरज असते ...
मस्त लिहिले आहे.
- Log in or register to post comments