दूर दूर जातानां
दूर दूर जातानां
मज जवळ ठेवशील ना रे?
आभाळाखाली तिथल्या
मज तु जपशील ना रे?
तुझे नि माझे गाणे
गुणगुणती गावा च्या वाटा
शपथ तुला ह्या वाटांची
हिरव्या तु बघशील ना रे?
दूर दूर जातानां
मज जवळ ठेवशील ना रे?
आभाळाखाली तिथल्या
मज तु जपशील ना रे?
आसवे कळीस भ्रमर तसे मी
पाहिन वाट तुझी रे
क्षण क्षण हे जाता जाता
हर क्षण मी तुज आठवीन ना रे?
दूर दूर जातानां
मज जवळ ठेवशील ना रे?
आभाळाखाली तिथल्या
मज तु जपशील ना रे?
--
अंतरातुनि वजा जाता
राहिन तुझाच सखी गं
डोळे मिटुनि बघशील
दिसेन मीच जवळ तुला गं
राहुन पाण्यात जशी ह्या
मास्यास विझे न तहान
प्रेमात तुझ्या तसा मी
कसे होईल प्रेम कमी गं?
--
दूर दूर जातानां
मज जवळ ठेवशील ना रे?
आभाळाखाली तिथल्या
मला तु जपशील ना रे?
💬 प्रतिसाद
(2)
प
प्रकाश१११
गुरुवार, 04/14/2011 - 06:20
नवीन
तुझे नि माझे गाणे
गुणगुणती गावा च्या वाटा
शपथ तुला ह्या वाटांची
हिरव्या तु बघशील ना रे?
छान लिहिले आहे .!!
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 04/14/2011 - 07:14
नवीन
व्वाह निनाव, बहोत खुब!!
हे तर खासच!!
- Log in or register to post comments