Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकलाच (ओवी-गीत-गझल-कविता)

ग — गणेशा, गुरुवार, 04/14/2011 - 17:00
१. (ओवी) प्रश्न प्रश्नांचे उत्तर दु़:ख सुखाचे आधार माझ्यासाठी मीच आता एकलाच दारोदार || चांदण्यास चंद्र भार नेत्रातुनी संथ धार परका आप्तजनात एकलाच मुक स्वर || भावनांचा कोरा पुर स्वप्नांचाच स्वैर धुर मनास अनोळखी मी एकलाच दूर दूर || कोण कोणाचा इश्वर माणुसकीचा संहार कुरवाळत दु:खास एकलाच जातो दूर || २. गीत ( राग लक्षात नाहिये, कारण त्यातील मला कळत नाहीच काही.. पण या गाण्याला 'दयाघना' या गाण्यास जो राग आहे तो राग वापरलेला आहे असे मित्राने गाताना सांगितले होते.. हे माझे पहिले आणि सेकंड लास्ट गाणे, चाल सांगता येत नाहिये.. पण दयाघना सारखे स्लो गाउन बघा जमले तर) अजून मी माझ्यातच जगते कुठे किनारा धरतीमाते जाणिव नाही कुणास माझी प्रवास मी एकटीच करते... गुलाम जीवन खितपत मळले नाव माझी धारेत डळमळे कुठली नाही दिशाच ठावी गांव कोठले मला न कळले भाव भावनांचा बाजारी एकटीच मी दारोदारी विरक्त जीवन ईश्वर कोठे भक्त म्हणुन ना कुणी स्विकारी अजून मी माझ्यातच जगते कुठे किनारा धरतीमाते जाणिव नाही कुणास माझी प्रवास मी एकटीच करते... ३. गझल असा मी माझा स्वता:तच रमतो तुझ्या साठी मी एकलाच जगतो विचारांच्या भोवर्‍यात निर्झर हा किनारा त्याचा उपराच ठरतो वसंतात शृंगारुदे निसर्गाला ग्रिष्मात वृक्ष ओंडकाच दिसतो पांघरुनी चांद नभात तारका भास्कर त्याला परकाच ठरतो नेत्राती तुझ्या प्रतिबिंबित कोणी ह्रद्याच्या गावी वेगळाच असतो ४. कविता (पाउस म्हंटल की रोमान्स आठवतो.. विरहातील बरसणे ही आठवते .. ही एक पावसावेळची वेगळी स्थीती घेवुन एकलीच अवस्था) काळजाची घुसमट आभाळाची घुटमळ सर सर नयनी चित्ताचीच ओघळण भय दाटले मनी ह्रदयी कंपणे झेलत ओठांचीच थरथर, तरी सरीवर सर नयनी नाभीपासुन चित्कार एक आत्म्याचा हुंकार नभी नाचते वीज आभास पिलवटून सरीवर सर .. अन एकलाच मी कासावीस एकलाच मी कासावीस ----------------- शब्दमेघ आठवड्यात जास्तीत जास्त एकच कविता तसे देत असतो येथे.. कविता लिहिण्यापेक्षा ही कविता वाचायला - त्यावर रिप्लाय द्यायला मस्त वाटते ..आवडते.. या वेळेस मात्र या आठवड्यातील दूसरी कविता देत आहे.. आणि ती पण वेगवगळ्या अवस्थ्यातील ४ कवितेंची सिरीज असलेली .. त्यामुळे क्षमस्व...

प्रतिक्रिया द्या
2868 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मेघवेडा गुरुवार, 04/14/2011 - 17:26 नवीन
एकच भाव वेगवेगळ्या काव्यप्रकारांतून! वा!!
भाव भावनांच्या बाजारी एकटीच मी दारोदारी विरक्त जीवन ईश्वर कोठे भक्त म्हणुन ना कुणी स्विकारी
मस्त! :) ओवी आणि गीत झकास जमले आहे! गझल आवडली नाही.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 04/14/2011 - 17:29 नवीन
धन्यवाद मनापासुन ... ही गझल मला पण नाही आवडली खरे तर ..पण एक वेगळी अवस्था प्रियकराची म्हणुन दिली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
प
प्रकाश१११ Fri, 04/15/2011 - 04:04 नवीन
गणेशा -एकच भाव निरनिराळ्या कवितेतून .खूपच छान. मस्त लय पकडलीस .अरे येउदेकी ..!!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 04/15/2011 - 04:04 नवीन
ओवी छान वाटली!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 04/15/2011 - 07:38 नवीन
क्या बात.... क्या बात... राजे मुजरा घ्या आमचा!! अरे काय लिहीलयस... तुफान.... जियो...
नाभीपासुन चित्कार एक आत्म्याचा हुंकार नभी नाचते वीज आभास पिलवटून
वाह.... खल्लास......
  • Log in or register to post comments
ड
डॉ अशोक कुलकर्णी Sat, 04/16/2011 - 07:51 नवीन
कवितेतला कपिलदेव (अष्ट्पैलू)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 04/19/2011 - 13:20 नवीन
मनापासुन धन्यवाद सर्वांचे .. @ डॉ. प्रतिसाद आवडला .. अष्टपैलू पणा नाहीये .. पण दर्जेदार लिहिण्याचा प्रयत्न नक्की करीत राहिन..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा