Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कृष्ण

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Fri, 04/15/2011 - 08:57
कृष्ण - १ कधी कधी वाटते...... कृष्ण होण्यापेक्षा राधा व्हावे...... पहाटेच्या चांद्रवैभवाचे रुपेरी चांद्रकण गाळणार्‍या कदंब वृक्षाखाली.......... सुंदर मोरपिसांच्या........ मोठ्या मोठ्या डोळ्यांची नक्षी असलेली..... उदात्त युगांतीत प्रेमाची भरजरी शाल पांघरावी.... म्हणजे मग..... द्रौपदीच्या अब्रूचे धिंडवडे निघतांना....... साध्या सुती साडीच्या दोन हात..... तुकड्याची चिंता करण्याची गरज उरत नाही....... कृष्ण - २ पण मग नंतर वाटते...... राधा होण्यापेक्षाही मीरा व्हावे......... कृष्णाच्या निळाईने भरलेल्या सहवासाची.......... स्मरणे आयुष्यभर वाहण्यापेक्षा..... कधीतरी मी त्या गिरिधराला अर्पण होईन ही भावना....... नाही.... ही "आशा" जास्त सुखदायी आहे..... कृष्ण - ३ कधी कधी असही वाटते...... कृष्ण होण्यापेक्षाही अर्जुन व्हावे........ बृहन्नडा होऊन एखाद वर्ष नाचावे लागेल...... परंतु......... घनघोर रणसंगर चालू असतांना........ काम, क्रोध, मद, मत्सर या चार घोड्यांचे लगाम हातात घेऊन....... नुसते बसून तर राहावे नाही लागणार........ कृष्ण - ४ कृष्ण होणेही तसे फार अवघड नाही...... अहो, अंधारकोठडीत जन्मत: मृत्यू पावणार्‍या...... सात भावांच्या पाठीवर जन्माला यायला कां भाग्य लागते....... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१५/०४/२०११)

प्रतिक्रिया द्या
5911 वाचन

💬 प्रतिसाद (31)
ह
हरिप्रिया_ Fri, 04/15/2011 - 09:15 नवीन
मस्त लिहिलि आहे... आवडली कविता,आणि त्यातले भाव पण...
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 04/15/2011 - 09:27 नवीन
आहो मि.का : तुम्हला साष्टांग घातले तरी कमीच असे मला वाटते आहे. इतुके सुंदर कसे काय सुचू शकते..व्वाह! भन्नाट!!! कृष्ण होणेही तसे फार अवघड नाही...... अहो, अंधारकोठडीत जन्मत: मृत्यू पावणार्‍या...... सात भावांच्या पाठीवर जन्माला यायला कां भाग्य लागते....... >>>>>> अशक्यच!!!!!!
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 04/15/2011 - 09:32 नवीन
अव्वल नंबर.. झक्कास रे मिका.. काय बोलू.. प्रतिभावान आहेस.. मनापासून दाद.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 04/15/2011 - 09:39 नवीन
कृष्ण-१ खूपच आवडले. विशेषतः "सुंदर मोरपिसांच्या........ मोठ्या मोठ्या डोळ्यांची नक्षी असलेली..... उदात्त युगातीत प्रेमाची भरजरी शाल पांघरावी...." हे फारच मस्त! कृष्ण-२ ही छान आहे. कृष्ण-३ मध्ये "घनघोर रणसंगर चालू असतांना........ काम, क्रोध, मद, मत्सर या चार घोड्यांचे लगाम हातात घेऊन......." हे तितकेसे आवडले नाही. रणसंगरात काम, मद कसा? त्यापेक्षा "घनघोर रणसंगर चालू असतांना, क्रोधाच्या बेफाम वारूंचे लगाम हातात घेऊन" असे योग्य वाटले असते असे वाटते. (वैयक्तिक मत.) कृष्ण-४ ठीक वाटले पण त्यातून ध्वनित होणार्‍या अर्थाबद्दल साशंक आहे.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 04/15/2011 - 10:28 नवीन
>>त्यापेक्षा "घनघोर रणसंगर चालू असतांना, क्रोधाच्या बेफाम वारूंचे लगाम हातात घेऊन" असे योग्य वाटले असते असे वाटते. (वैयक्तिक मत.) सहमत आहे. :) >>कृष्ण-४ ठीक वाटले पण त्यातून ध्वनित होणार्‍या अर्थाबद्दल साशंक आहे. यात मला अभिप्रेत असलेला अर्थ असा की कृष्णाला अवतारी पुरुष मानतात, पण माझ्यामते तो अवतारी पुरुषापेक्षा पराक्रमी पुरुष होता. त्याने केलेल्या चमत्कारांकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहीले तर लक्षात येते की त्याच्या काळासाठी ते प्रकार नविन होते म्हणुन चमत्कार मानले गेले आणि नंतर त्याला देवत्व बहाल झाल्यावर ते 'दैवी चमत्कार' झाले. असो. हा सगळा उहापोह ख व तुन होऊ शकतो. संयमीत प्रतिसादाबद्दल लाख लाख धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
स
स्पा Fri, 04/15/2011 - 09:41 नवीन
खरच मनापासून दाद, छान लिहील आहेस
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Fri, 04/15/2011 - 09:59 नवीन
अस्सल......
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 04/15/2011 - 10:52 नवीन
मुक्तक म्हणा वा मुक्तछंद - कविता अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 04/15/2011 - 10:58 नवीन
मस्तच भाग १ खुपच आवडला .. भाग २ मस्त भाग३ आणि ४ अजुन हवे होते त्यात काहितरी असे वाटते आहे.. बाकी लिहित रहा.. वाचत आहे...
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Fri, 04/15/2011 - 13:11 नवीन
छान .
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 04/15/2011 - 13:16 नवीन
मिका, जरी तुमचे त्याकाळातले वगैरे स्पष्टीकरण पटले नसले तरी मूळ कविता मला उमगलेल्या अर्थाने फार छान वाटली.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 04/15/2011 - 13:19 नवीन
फार आवडले मुक्तक!
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Fri, 04/15/2011 - 19:22 नवीन
मीरेचा भाव आवडला..... अप्रतिम.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/15/2011 - 19:26 नवीन
कविता आवडली..........! कृष्ण-२ खास. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sat, 04/16/2011 - 01:58 नवीन
चांगले आहे. कविते पेक्षा मुक्तक असल्यासारखे वाटतेय. प्रत्येक ओळीच्या शेवटी एवढे टिंब देण्यामागे काय प्रयोजन आहे?
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 04/16/2011 - 05:38 नवीन
पु का स्फू शु
  • Log in or register to post comments
ड
डॉ अशोक कुलकर्णी Sat, 04/16/2011 - 07:42 नवीन
मीरा, राधा आवड्ले.... (अवांतर) पण आमचा अभिमन्यू झालाय त्याचं काय?
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sat, 04/16/2011 - 08:28 नवीन
कळले नाही??
पण आमचा अभिमन्यू झालाय त्याचं काय?
म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ अशोक कुलकर्णी
न
निनाव Sat, 04/16/2011 - 13:03 नवीन
कदाचित, तुमच्या सुंदर काव्या च्या चक्रा मधे आम्ही आडकलो आहोत कि बाहेर पडता येत नाहिये - असे म्हणायचे असेल अशोक जीं ना....कारण मला सुद्धा तेच वाटते आहे.. तुमचे काव्य इतुके सुंदर असते कि पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
स
स्पंदना Mon, 02/04/2013 - 09:03 नवीन
सारेच शापित! एकमेकाच्या आधाराने जगलेले की एकमेकाच्यात गुंतल्याने फरफटलेले म्हणावे? मिका सुंदर. त्यातल्या त्यात राधा मला फार वेड लावते. कितीतरी रचना नुसत्या तिच्या भावना घेउनच जन्मल्या.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 02/04/2013 - 09:14 नवीन
मिका मिका मिका त्रिवार _____/\_____
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Wed, 02/06/2013 - 11:03 नवीन
+१०००० शब्दच नाहीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
उ
उपटसुंभ Mon, 02/04/2013 - 09:23 नवीन
कल्पना आवडली..! एकदम वेगळा विचार मांडला आहे..! "अंधारकोठडीत जन्मत: मृत्यू पावणार्‍या...... सात भावांच्या पाठीवर जन्माला यायला कां भाग्य लागते..." पण पुढे जन्म काढता यायला भाग्यच हवं ना..! कारण कृष्णाने जन्म घेण्यासाठी आधीच्यांनी मरायलाच हवं अशी काही गरज नव्हती.ती जिवंत राहूनही कृष्णजन्म होऊ शकला असताच की. कृष्ण हा अवतार नाही असं मानलं तर त्याच्या जिवंत राहण्याचं श्रेय वसुदेव किंवा आणखी कुणाला द्यावं लागेल. मग ते त्याच्याच बाबतीत का व्हावं? आधीच्यांच्या बाबतीत का नाही ? हे भाग्यच नव्हे का ? अर्थात हे मला उमगलेल्या अर्थावरुन. मिकांना काही वेगळा अर्थ अपेक्षित आहे का ?
  • Log in or register to post comments
त
तिमा Mon, 02/04/2013 - 13:59 नवीन
कृष्ण -२ हे सर्वात आवडले.
  • Log in or register to post comments
श
श्रिया Mon, 02/04/2013 - 17:23 नवीन
सुंदर प्रस्तुति.
  • Log in or register to post comments
स
समयांत Tue, 02/05/2013 - 05:43 नवीन
कृष्ण ३ जास्त आवडले.
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 02/05/2013 - 14:55 नवीन
चवथा भाग वाचला आणि डोळ्यात साक्षात पाणी तरारलं. कृष्णाचं दु:ख आपण जाणलत मिका.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 02/06/2013 - 12:50 नवीन
कृष्ण १,२,३ मस्त ..आवडले ...४ चा अर्थ अजुन शोधत आहे :)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 02/06/2013 - 16:32 नवीन
कधी पाहिले असो वा नसो, सख्ख्या भावंडांशी असलेली जवळिक वेगळी असते. आधीची भावंडे गेलेले, किंवा जुळ्यातले एकटेच उरलेले अश्या कुणी व्यक्ती जवळून बघितल्या, तर त्यांचा सल दिसू शकेल.
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय गुरुवार, 02/07/2013 - 10:39 नवीन
जुळ्यातले एकटेच उरलेले .. :( कल्पनापण किती बोचणारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
अग्निकोल्हा Wed, 02/06/2013 - 17:23 नवीन
बेरकी, सगळ्याचा सुत्रधार या झालरीपेक्षा फार वेगळी कल्पना फुलवली आहे! सुरेख.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा