Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आकुंचन

न — निनाव, Fri, 04/15/2011 - 21:25
कोठे गेले पूल, कोठे गेले रस्ते, सापडत नाहिये व्यायामशाळा मुलांचे दप्तर, वह्या अन झब्बे अन आज काय तर गेले पाणी अन सोबत गेल्या वाहूनी जल-वाहिन्या दॄष्टीहिनास मिळाला आज काय सांगू जड-वाहन चालविण्याचा परवाना गल्ली-बोळात गरज तिथे उभा आज वैद्यकिय सहाय्य्कांचा दवाखाना ओरबाडली गेली लज्जा कुणाची दमटवले गेले कुणाला दाबली जमीन कुणाची तर खल्लासच केले कुणाला अपंग व्यवस्था, लुळे कायदे लुटले गेले आज भर चौकात मज दिसलेच नाही हे सगळे काय सांगू 'व्यस्त' होतो मी 'जवळचे' बघताना लोचट-गिरी ला उरले नाही वय पाहावा तिथे रोग मानसिक विकॄती चा लहान असो वा मोठी - लाज कुणाची तिला वरतून खाली बघातांना साठे झाले जप्त, साखरेचे, मात्र गोडवा अनुपस्थित बातमीत कांदे-बटाट्यांसोबत - शब्द ही झाले आहेत महाग हल्ली स्मित हास्याचाही पडला आहे तुटवडा झाले घराचे कुंपण छोटे, मनाचेही, मस्तकाचेही आकुंचले आहेत हृदय , मदतीस धावणारे हातही "ना आउंगा मै तेरे घर, ना तु मेरे आना" देश, समाज, आदर, मानवी-मुल्ये? श्श्या..असलं काय सांगता राव- काही चवदार सांगाना

प्रतिक्रिया द्या
1153 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
प्राजु Fri, 04/15/2011 - 22:49 नवीन
हम्म!! तुमची तगमग छान उतरली आहे. काय करणार याला.. परिस्थिती अशी नुसतीच नाही सुधारत ना!
  • Log in or register to post comments
A
ajay wankhede Sat, 04/16/2011 - 04:19 नवीन
झाले घराचे कुंपण छोटे, मनाचेही, मस्तकाचेही आकुंचले आहेत हृदय , मदतीस धावणारे हातही व्वा..अजुनही वेळ गेलेलि नाही... च रैवेति..च रैवेति.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Sat, 04/16/2011 - 08:21 नवीन
निनाव - मस्त नि झकास साठे झाले जप्त, साखरेचे, मात्र गोडवा अनुपस्थित बातमीत कांदे-बटाट्यांसोबत - शब्द ही झाले आहेत महाग हल्ली स्मित हास्याचाही पडला आहे तुटवडा चांगली लय लागलीय.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sat, 04/16/2011 - 08:30 नवीन
मस्त रे!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा