Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा -

व — विदेश, Sun, 04/17/2011 - 11:13
(चाल : देहाची तिजोरी - भक्तीचाच ठेवा ) फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा पकडणार चोरांना त्या - पकडणार केव्हा ? नसे दूर चौकी इथुनी फार पोलिसांची , तरी चोरटयांच्या नाही भीती मुळी त्यांची - सरावल्या चोरांनी का दंड थोपटावा ? उजेडात होते पहाणी - अंधारात साsssफ चोरट्यांच्या हाती लागे द्रव्य ते अमाप - दक्ष पोलिसांची कैसी नसते गस्त तेव्हां ? फार्स जणू जप्तीकरता - कायदा कचेरी आपुलीच वर्दी होते आपुलीच वैरी - माल मनी तो जप्तीचा सत्वरी मिळावा !!

प्रतिक्रिया द्या
1779 वाचन

💬 प्रतिसाद (2)
न
निनाव Sun, 04/17/2011 - 11:31 नवीन
:) सह्हीच. वास्त्वयच. 'जे न देखे रवि...' प्रचिती पुन्हा एकदा. खूप छान.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Sun, 04/17/2011 - 15:36 नवीन
स्विस बँकेत अकाउण्ट कसे काढतात, हे कोनीतरी सांगा राव ! ही कविता वाचुन घरघर लागुन राहीली आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा