Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कविता माझी

न — निनाव, Sun, 04/17/2011 - 11:37
वय धावते आहे तरी, कधी वेळ थांबतेच मग कितीही ठरविले लिहायचे नाही, तरी पेन उचलले जाते धडपडच सुरु होते माझ्या मनी मग असंख्य लाटांची आणि उतरते मग त्यातून सावरत.. नाजुक कविता माझी .. सुंदर मउ पायांनी .. अलगद पाउले टाकत उघडून दार मनाचे बाहेर डोकावत थांबते, थोडी लाजते मग पुन्हा नजर उचलून बघते माझ्या डोळ्यात स्पर्शते मन माझे..अन ऐकते स्पंदन हृदयातले डोळे माझे निजतात शब्द माझे पोहोचतात भावनांच्या खोल समुद्रात माझेच मला कळत नाही मग भान वेळे चे उरत नाही मग अन उतरते ती हळुवार विश्वात माझ्या .... कविता माझी !

प्रतिक्रिया द्या
1650 वाचन

💬 प्रतिसाद (7)
न
नरेशकुमार Sun, 04/17/2011 - 15:42 नवीन
लग्ना अगोदर असे झाले होते
वय धावते आहे तरी, कधी वेळ थांबतेच मग कितीही ठरविले लिहायचे नाही, तरी पेन उचलले जाते धडपडच सुरु होते माझ्या मनी मग असंख्य लाटांची आणि उतरते मग त्यातून सावरत.. नाजुक कविता माझी ..
. . लग्ना ठरल्यावर असेच होत होते
सुंदर मउ पायांनी .. अलगद पाउले टाकत उघडून दार मनाचे बाहेर डोकावत थांबते, थोडी लाजते मग पुन्हा नजर उचलून बघते माझ्या डोळ्यात स्पर्शते मन माझे..अन ऐकते स्पंदन हृदयातले
. . . . लग्न होन्याच्या क्षणी असे वाटुन गेले.
डोळे माझे निजतात शब्द माझे पोहोचतात भावनांच्या खोल समुद्रात माझेच मला कळत नाही मग भान वेळे चे उरत नाही मग अन उतरते ती हळुवार विश्वात माझ्या ....
..............
अन उतरते ती हळुवार विश्वात माझ्या ....
ही ओळ खुप आवडली, कसा विसरेन तो क्षण !
  • Log in or register to post comments
न
निनाव Sun, 04/17/2011 - 16:29 नवीन
ह्हा हहा :) लै भारी परतिसाद बघा.. आवडलं.. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Sun, 04/17/2011 - 17:25 नवीन
निनाव -उत्तमच कविता. सुंदर !!
  • Log in or register to post comments
न
निनाव Sun, 04/17/2011 - 17:29 नवीन
आभार प्रकाश दा. :)
  • Log in or register to post comments
A
ajay wankhede Sun, 04/17/2011 - 20:40 नवीन
शब्द्च नाहित म झ जवळ डोळे माझे निजतात शब्द माझे पोहोचतात भावनांच्या खोल समुद्रात.....व्वा..
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 04/18/2011 - 07:13 नवीन
फार सुंदर रचना निनाव!! खुप खुप आवडली.... असच छान छान लिहीत रहा..... :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/18/2011 - 18:55 नवीन
अप्रतिम रचना निनाद ... खुप्प आवडली कविता .. खुप तरल भाव .. वाचतच रहावेत असे शब्द मनापासुन आवडली कविता.. वाचणखुण म्हणुन साठवलेली आहे कविता ... अप्रतिम असेच लिहित रहा... वाचत आहे ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा