समुद्र भरल्या डोळ्यांनी
निशब्द पण बोलके क्षण,
हसरे अन लाजरे क्षण,
गालाच्या खळी आडून वेडावणारे तर
ओठांनी खुणावणारे क्षण.
वेणीच्या पेडा बरोबर सुटतं जाणारे तर
तु़झ्या मनात गुंतत जाणारे क्षण.
क्षण तु़झ्या-माझ्या भेटीचे
शोधतोय मी...
समुद्र भरल्या डोळ्यांनी....
💬 प्रतिसाद
(4)
न
निनाव
Sun, 04/17/2011 - 18:55
नवीन
:) मस्तच झालीये. पण अजुन छान येऊ द्या. थोडं सं काही तरी अजून असायला हवे होते, असे वाटते आहे.
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Sun, 04/17/2011 - 19:16
नवीन
अरे बापरे..
वेणीचे पेड जोरदार :)
(वरच्यांच्या गॅलरीतून खाली आलेल्या गुंतवळांवर विचार करण्यात गुंतलेला)
लिखाळ.
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/18/2011 - 07:28
नवीन
खुप सुंदर!! आवडेश....
short-n-sweet!!
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 04/18/2011 - 18:50
नवीन
समुद्र भरल्या डोळ्यांनी....
हि ओळ मस्त एकदम
- Log in or register to post comments