Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कठीण आहे कधी कधी

न — निनाव, Sun, 04/17/2011 - 22:17
कठीण आहे कधी कधी लिहिणे शब्दांना तुझ्या हृदयाची भाषा ओठांस कळतांना आठवत नाहीत शब्द तु समोर असतांना नेहमीच पडतात अपुरे मग तुला लिहितांना लाजुन जे झुकतात नजरांचे प्रणय होतांना शब्दात करू कसे परिमित अश्या तुझ्या डोळ्यांना हरवतो मी तुझ्या ह्रदयाचे स्पंदन तीव्र ऐकतांना सांग आता लावू कसे शब्द ह्या चालीस बसतांना बांधु कसे शंब्दात अल्हड केश तुझे ते उडतांना जीवच जाईल माझा तसा प्रयत्न देखील करतांना कठीण आहे कधी कधी लिहिणे शब्दांना तुझ्या हृदयाची भाषा ओठांस कळतांना

प्रतिक्रिया द्या
1173 वाचन

💬 प्रतिसाद (4)
आ
आत्मशून्य Sun, 04/17/2011 - 23:03 नवीन
हे मान्य.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Mon, 04/18/2011 - 06:10 नवीन
निनाव - कठीण आहे कधी कधी लिहिणे शब्दांना तुझ्या हृदयाची भाषा ओठांस कळतांना छानच लिहिले आहे.एकदम मस्त !!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/18/2011 - 18:49 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश१११
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 04/18/2011 - 07:26 नवीन
छान लिहीले आहे!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा