Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू

प — पाषाणभेद, Mon, 04/18/2011 - 23:01
शेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू

अगं ए पारू; होवूया आपण आता सुरू हाती येईल आपल्या पैका चल शेतात आंतरपीक आपण करू ||धृ|| पावरबाज मंतार आंतरपिकाचा अनुभव आहे मोठ्या लोकांचा तोंडं बोलती त्यांची वाचा काय सांगू, कसं सांगू मी आता कसा ग धिर धरू चल शेतात आंतरपीक आपण करू ||१|| आसं नको बघू लई खाली वाकून पिक नको उघडं करू, ठेव झाकून पक्षी अन किडे, वारं-वावधान पिक ठेव त्यापासून राखून नायतर म्हनायची टोळधाड कशी मी आवरू? चल शेतात आंतरपीक आपण करू ||२|| लावू उस मका केळी अन ज्वारी झालंच तर आहे द्राक्षे गहू बाजरी फळाफुलासोबत करू आपण लावणी आगं मुख्य पिकासोबत सार्‍या दाळी अन कडधान्य दाळी पेरू चल शेतात आंतरपीक आपण करू ||३|| पिकाचं पिढीजात वैरी हाय हे तण जा म्हटलं तरी जात नाही हे बेणं आंतरपिकानं जमीन जाती झाकून सुर्यप्रकाश तणाला मिळत नाही त्यानं अशानं बंदोबस्त होतो तणाचा आन तण लागतं मरू चल शेतात आंतरपीक आपण करू ||४|| पालापाचोळा त्या तिथंच खाली पडं जमीनीत खत होवून तो मग मुरं उत्पन्नात वाढ भरघोस होईल ग सुरू चल शेतात आंतरपीक आपण करू ||५|| आता मी राजा ग शेताचा गुणी नटशील कशी तू आक्षी राणीवाणी घालीन दहा तोळ्याची माळ तुझ्या गळी आखाजीला रास धान्याची तू ओवाळी लाजू नको बुजू नको तू नको तू आता बावरू चल शेतात आंतरपीक आपण करू ||६|| - पिकांची लावणी करणारा प्रगतीशील शेतकरी - पाषाणभेद (दगडफोड्या) १९/०४/२०११

प्रतिक्रिया द्या
1730 वाचन

💬 प्रतिसाद (4)
न
निनाव Mon, 04/18/2011 - 23:38 नवीन
पाभे - शत-शत कोटी प्रणाम तुम्हांस! इतुके सुंदर गीत रचले आहे. मस्तच. खुपच सुंदर. किती छान आणिक लयदार आहे ही रचना. वाचता वाचताच लय लागली. शेत दिसू लागले.. पीकं दिसू लागली.. व्वाह सुंदर वर्णन. विशेषतः शेतकरी ला किती जबरदस्त मेस्सेज दिला गेला आहे ह्यातून.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 04/19/2011 - 07:22 नवीन
आसं नको बघू लई खाली वाकून पिक नको उघडं करू, ठेव झाकून पक्षी अन किडे, वारं-वावधान पिक ठेव त्यापासून राखून नायतर म्हनायची टोळधाड कशी मी आवरू? चल शेतात आंतरपीक आपण करू
मस्त मस्त!! एक शंका: आखाजीला रास धान्याची तू ओवाळी आखाजी म्हणजे काय हो?
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 04/19/2011 - 10:50 नवीन
शंका विचारल्याबद्दल धन्यवाद, मिका. आखाजी म्हणजे - अक्षय तृतीया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
ग
गणेशा Tue, 04/19/2011 - 16:48 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा