Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भेट घ्यायची ओढ लागली

प — पाषाणभेद, Tue, 04/19/2011 - 22:48
भेट घ्यायची ओढ लागली

नकोच आता दुर जराही भेट घ्यायची ओढ लागली ||१|| हिरव्या वाटा उंच तरूवर प्रकाशाचे किरण त्यावर ||२|| ओळखीच्या त्या झाडे वेली नेहमीची त्यांनी जादू केली ||३|| वायू परिचीत पानांस लागला थरथर त्यांना देवूनी गेला ||४|| नजरेच्या टापूत आले समोर शांत नितळ शितल सरोवर ||५|| हृदयाच्या कप्यात हुरहुर झाली जुन्या स्मृतींची आठवण आली ||६|| विरह कसला असला नसता नकोच ते दुर असणे आता ||७|| श्रम पुरले वेळही सरली भेट घ्यायची ओढ लागली ||८|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २०/०४/२०११

प्रतिक्रिया द्या
1911 वाचन

💬 प्रतिसाद (5)
न
निनाव Tue, 04/19/2011 - 23:10 नवीन
पाभे, तुम्ही जबर्दस्त वर्साटाईल कलाकार आहात. - जबर्‍या! खूप शुभेच्छा! -आ. निनाव.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Wed, 04/20/2011 - 01:36 नवीन
वंटास !
नजरेच्या टापूत आले समोर शांत नितळ शितल सरोवर ||५||
विशेश आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Wed, 04/20/2011 - 01:38 नवीन
पाषाणभेदा -छान जमलीय. उत्तम !!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 04/20/2011 - 07:18 नवीन
नि:शब्द!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 04/20/2011 - 16:49 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा