Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

[पेग घ्यायची ओढ लागली]

न — निनाद, Wed, 04/20/2011 - 05:17
पाषाणभेदाची क्षमा मागून एक टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन सादर करत आहे. [पेग घ्यायची ओढ लागली] नकोच आता दुर सुराही पेग घ्यायची ओढ लागली ||१|| पत्ते वाटा बसू गच्चीवर नसे कुणाची दृष्टी तेथवर ||२|| ओळखीच्यांना उधार दिली माज करत ती सांडवत नेली ||३|| वायू परिचीत नाकास लागला टुरटुर आवाज देवूनी गेला ||४|| नजरेच्या टापूत आले समोर मारून फेकले लाटणे तोवर ||५|| पत्यांच्या खेळात कुरुकुर झाली जुन्या उधारीची आठवण आली ||६|| गेमच कसला असला नसता मुकाट पत्ते पिसणे आता ||७|| पेगही पुरले भेळही सरली 'आत' जायची ओढ लागली ||८||

प्रतिक्रिया द्या
2318 वाचन

💬 प्रतिसाद (9)
च
चिंतामणी Wed, 04/20/2011 - 05:38 नवीन
सकाळी सकाळी???????? :(
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 04/20/2011 - 06:00 नवीन
रात्रभर प्यायल्यावर ओढ सकाळीच लागायची. :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Wed, 04/20/2011 - 06:28 नवीन
निनाव- गेमच कसला असला नसता मुकाट पत्ते पिसणे आता ||७|| पेगही पुरले भेळही सरली 'आत' जायची ओढ लागली ||८|| छान .चव मस्त वाटली !!
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Wed, 04/20/2011 - 07:17 नवीन
पेगही पुरले भेळही सरली 'आत' जायची ओढ लागली ||८||
या पामरास अर्थ बोध झाला नाही.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 04/20/2011 - 07:22 नवीन
खरोखर 'एक टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन'
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 04/20/2011 - 07:34 नवीन
अतिशय हा शब्द विसरलात का? खरोखर 'एक अतिशय टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन' हे योग्य वाटते.
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 04/20/2011 - 08:24 नवीन
तुम्ही जिंकले आहे हेल्मेट! Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बन्या बापु Wed, 04/20/2011 - 08:37 नवीन
कविता वाचुन आता....घ्यावा म्हणतो एक छोटासा...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 04/25/2011 - 03:37 नवीन
अरे आमचे तर लक्षच नाही असल्या प्रकारांकडे! छान!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा