Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पावसात भिजतांना

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Wed, 04/20/2011 - 07:37
बरसणार्‍या मेघधारांना वार्‍यावर पेटतांना पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना सरीवर सर कोसळून हे कृष्ण मेघ गडगडतांना पहायचेय तप्त धरेसह माझ्या मनास निवतांना रुसलेल्या गुलाबाच्या कळीला हलकेच उमलतांना पहायचेय क्षितिजावरील इंद्रधनुष्यातील सप्तरंगांना ग्रीष्माचा दिवस सारून श्रावणसांज अवतरतांना पहायचेय जाईवेलास फिरुनी तरुण होतांना ओलेत्याने तिला माझी कविता गुणगुणतांना पहायचेय मोहरून तो कोकीळकंठ पालवतांना पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना पहायचेय तिने मला एकदा, मी तिला चिंबून पाहतांना |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२०/०४/२०११)

प्रतिक्रिया द्या
2660 वाचन

💬 प्रतिसाद (14)
न
निनाद Wed, 04/20/2011 - 07:45 नवीन
कसली ओलेती कविता आहे. पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना पहायचेय तिने मला एकदा, मी तिला चिंबून पाहतांना चिंबून? कशा खाली चिंबून तिने पाहायला हवे आहे म्हणे? चिंबलेले म्हणजे दाबले गेलेले. तुम्ही तिला दाबून पाहत असतांना तिने तुम्हाला पाहावे असा अर्थ असेल तर मग योग्य आहे. चुंबुन असे म्हणायचे आहे का मिका?
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 04/20/2011 - 07:58 नवीन
कशा खाली चिंबून ?? अहो पावसात चिंब होऊन असे म्हणायचे आहे!! तुम्ही तिंबून वाचले का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद
ग
गणेशा Wed, 04/20/2011 - 16:32 नवीन
रीतसर प्रतिसाद खाली दिलेला आहे अवांतर : पहायचेय तिने मला एकदा, मी तिला यातुन असा काहीच निट अर्थ कळेना .. पहायचेय तिने मला एकदा आणि परत मी तिला कळाले नाही.. अति अवांतर :
पहायचेय तिने मला एकदा, मी तिला चिंबून पाहतांना
चिंबुन हा शब्द गावाकडे चिंबलेला ह्या स्वरुपातच बोलतात .. म्हणजे आपारप्पी खेळताना कचकद्याचा बॉल चिबुन जायचा.. अश्या अर्थाने.. चिंबुन हा शब्द भिजुन सारखा नाहि उपयोगात येत .. पण ठिक आहे.. नाहितर मी तीला ओलीचिंब पहाताना कसे वाटते आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
आ
आत्मशून्य Wed, 04/20/2011 - 21:58 नवीन
मी तीला ओलीचिंब पहाताना कसे वाटते आहे ?
चावट वाटत आहे ;). @मिसळलेला काव्यप्रेमी मस्त कवीता, नेमकी ऊन्हाळ्यात टाकलीत ? आता हे दोन महीने काय फक्त ही कवीता आठवत काढायचे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
क
किसन शिंदे Wed, 04/20/2011 - 07:51 नवीन
मस्तच.... :)
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 04/20/2011 - 07:52 नवीन
काहीतरी कॉम्प्लेक्स आहे बॉस.कुठल्यातरी म्हातारीच्या प्रेमात पडलास का क्काय ?
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 04/20/2011 - 07:55 नवीन
पहायचेय जाईवेलास फिरुनी तरुण होतांना बरोबर रामदासशेट इथे लोच्याय राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 04/20/2011 - 07:59 नवीन
अवघड आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 04/20/2011 - 07:56 नवीन
काय हो काय काका? कसला कॉम्पलेक्स म्हणताय? आणि
रुसलेल्या गुलाबाच्या कळीला हलकेच उमलतांना पहायचेय क्षितिजावरील इंद्रधनुष्यातील सप्तरंगांना
हे म्हातारीसाठीचे वाटतेय? तुम्ही पण ना काका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
न
निनाद Wed, 04/20/2011 - 08:06 नवीन
सरीवर सर कोसळून हे कृष्ण मेघ गडगडतांना पहायचेय तप्त धरेसह माझ्या मनास निवतांना रुसलेल्या गुलाबाच्या कळीला हलकेच उमलतांना पहायचेय क्षितिजावरील इंद्रधनुष्यातील सप्तरंगांना हे मात्र खरेच आवडले. चांगली जमली आहे रचना.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 04/20/2011 - 16:24 नवीन
असेच म्हणतो सरीवर सर कोसळून हे कृष्ण मेघ गडगडतांना पहायचेय तप्त धरेसह माझ्या मनास निवतांना रुसलेल्या गुलाबाच्या कळीला हलकेच उमलतांना पहायचेय क्षितिजावरील इंद्रधनुष्यातील सप्तरंगांना ----
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद
ग
गवि Wed, 04/20/2011 - 08:30 नवीन
वा.. एप्रिलमधेच उकाडा मे म्हणायला लागलाय आणि पावसाची कविता आली. छान रे मिका.
  • Log in or register to post comments
न
निनाव Wed, 04/20/2011 - 10:15 नवीन
मिका: खल्लास केले तुम्ही. झक्कासच!!!! :)
  • Log in or register to post comments
प
पियुशा Wed, 04/20/2011 - 12:36 नवीन
वा वा वा !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा