Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवा खेळ

म — मिसळलेला काव्यप्रेमी, गुरुवार, 04/21/2011 - 10:31
आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला अवघे आभाळ काजळून कंठ माझा दाटला पंचप्राण शोषून माझे जीव असा टांगला तुझ्या स्मरणात भिजता कसा हा जडावला वर्षाव मोहरलेल्या तुझ्या स्वप्नांचा बरसला मनास माझ्या वाहवत क्षितीजास घेऊन गेला क्षितिजी तुझ्या स्मरणांचा आता वणवा पेटला वाहत आलेल्या मनास माझ्या चटका लावून गेला प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला जीवास सुखावून काळजास हुरहूर देऊन गेला |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२१/०४/२०११)

प्रतिक्रिया द्या
1472 वाचन

💬 प्रतिसाद (5)
व
विदेश गुरुवार, 04/21/2011 - 13:54 नवीन
प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला सुरेख !
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 04/21/2011 - 14:52 नवीन
अरे काय चाल्लेय काय? पावसात वणवा? पावसात गारपीट ठीक पण वणवा? गारपीटीत तुझ्या सरणांचा आता वणवा पेटला वाट पाहत आलेल्या मनास माझ्या मटका लावून गेला कसे वाटते? -काव्य बाधिर्याचा बादश्शा निनाद
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 04/21/2011 - 15:04 नवीन
गारपीटीत तुझ्या सरणांचा आता वणवा पेटला वाट पाहत आलेल्या मनास माझ्या मटका लावून गेला
हा ! हा!! हा!! भारी आहे!! __/\__ तुम्हाला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद
न
निनाव गुरुवार, 04/21/2011 - 22:48 नवीन
मि.का., खूपच सुंदर. प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला सुंदरच. व्वाह.
  • Log in or register to post comments
अ
अलोककुमार Sun, 04/24/2011 - 12:04 नवीन
प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला सुंदरच. व्वाह.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा