पाककृती

स्टफ चमचम- बंगाली मिठाई

Primary tabs

साहित्यः १/२ किलो घरगुती पनीर (बाजारातून आयते आणलेले ही चालेल) १ कप साखर ३ कप पाणी १ टीस्पून रोझ इसेन्स २-३ थेंब गुलाबी खायचा रंग १ टीस्पून वेलचीपूड २ टेस्पून पिठीसाखर पाकृ: पनीर चांगले मऊ मळून घ्यावे व त्याचे दोन सारखे भाग करावेत. एका भागात खायचा गुलाबी रंग घालून मळावे व त्याचे लंबगोल बनवावे (ओव्हल शेप). Image removed. जाड बुडाच्या भाड्यांत साखर+पाणी +रोझ इसेन्स घालून उकळी आणावी. उकळी आली की त्यात छोटासा गुलाबी पनीरचा तुकडा सोडून बघावा, फुटला नाही तर हे गुलाबी गोळे अलगद सोडावे व झाकून ८-१० मिनिटे शिजु द्यावे. Image removed. नंतर गोळे उलटवून पुन्हा ५-७ मिनिटे शिजु द्यावेत. शिजल्यावर थोडे गार झाले की हे चमचम पाकातून बाहेर काढावे. मायक्रोव्हेव सेफ भाड्यांत पनीरचा दुसरा भाग घ्यायचा , त्यात वेलचीपूड आणी पिठीसाखर घालून एकजीव करायचे. मायक्रोव्हेवमधे ३० सेकंद शिजवून घ्यायचे. गुलाबी चमचमचे मधून दोन भाग करुन त्यात पांढर्‍या पनीरचे मिश्रण भरावे व अलगद दाबून बंद करावे. पिस्ते लावून सजवावे. Image removed.
गणपा

यम यम !!!!
आवांतर : आमच्या राजकुमारासाठी या पनीरला पर्याय सुचवा बॉ.
अती-आवांतर : चम चम म्हटली आमच्या डॉल्या म्होरं बेंद्र्यांची सोनालीच येते. ;)

टारझन

वा वा .. पाककृती लाजबाव आहे .. स्त्रीप्रधान वाटते ;)

* पण शेवटचा फोटु आणि ह्या प्रकारच्या मिठाया अंमळ अश्लिल वाटतात :)

-( श्लिल सहीवाले) बंगाली बाबु

कौशी

सोपे वाटते करायला पण उकळताना फुटले तर काय करायचे??
पनीर किती वेळ मळायचे ??

उकळताना फुटु नये म्हणून पनीर चांगले ८-१० मिनिटे मळायचे आणी पाकात छोटासा गोळा घालून बघायचा फुटतो का ते, जर फुटला तर आणखीन थोडा वेळ पनीर मळायचे एकदम मऊसूत.

प्रास

मी चाललो आले-लिंबाचे पाचक घ्यायला...... (इनो घेऊन आपला पैसा परदेशी का पाठवा? ;-))

यशोधरा

आई ग्गं! भारी पाकृ :) फोटो, कृती सगळंच महान!

प्राजु

अरे हे तर एकदम सोपं आहे!
नक्की करेन. :)
शेवटचा फोटो क्लास आला आहे.

पिंगू

एकदम सोपी पाककृती आहे.

- पिंगू

सूड

इसेन्स आणि रंग न घालता केलं तर बरं लागेल का हो ??

रंग न घालता केलं तर चालेल पण इसेन्स घातला तर छान चव येते तरीसुध्दा जर का रोझ इसेन्स घालायचा नसेल तर गुलाब-पाणी घालून बघा...कदाचित थोडा फरक पडेल .

अन्या दातार

भीषण भालो सानिकातै.

अवांतरः मी बंगालमध्येच राहत असल्याने इनो/आले-लिंबाचे पाचक याची गरज वाटत नाही :D :D

लोकांच्या जखमेवर लई मीठ चोळले,आता पळा.........

टारझन

अगदी असेच म्हणतो ;) शेवटचा फोटु खतरणाक :)

-(शेवटचा फोटु प्रेमी) संगमनेर

५० फक्त

मेलो, खपलो,

स्म्पादक म्न्ड्ळाने या कलाकुसरी मंडळीना एक विशिष्ट वेळ द्यावा पोस्ट कराय्ला म्हणजे तेंव्हा मिपावर येण नको आणि वजन वाढणं पण नको.

RUPALI POYEKAR

लय भारी आहे हो तुमची बंगाली मिठाई, व्वा छान छान

दीविरा

मला फोटो दिसत नाहीत :(

आनंदाला मुकले मी

बंगाली मिठाई हा माझा गोडातला आवडता प्रकार आहे.

स्पंदना

छानच! पण बहुतेकदा माझ पनिर पाण्यात घालुन उकळताना सुटत अन मग मुडच रहात नाही पुढची उसाभर करायचा.