Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असेलही कुठे कुठे

B — bhaktipargaonkar, Fri, 04/22/2011 - 14:19
असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे खडतर वाटेवर सापडेल जिणे कशासाठी कुणासाठी रडावे अपार काय सख्या आणले तू, काय तू नेणार ? रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?

प्रतिक्रिया द्या
1075 वाचन

💬 प्रतिसाद (4)
B
bhaktipargaonkar Fri, 04/22/2011 - 14:22 नवीन
पहिलीच कविता आहे .....काही सूचना असतील तर जरूर द्याव्यात
  • Log in or register to post comments
न
निनाव Sun, 04/24/2011 - 09:00 नवीन
फक्त एक सुझाव. शेवटच्या ओळीत : "स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?" ह्या एवजी : "स्वतःचाच दोष द्यावा उगाच रे कुणासी?" <<< रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष द्यावा उगाच रे कुणासी? >>> असा बदल करता येउ शकेल काय ते पाहा. बाकि कविता सुंदरच आहे. कविता लिहिण्याचा प्रयत्न प्रथम असेल. पण कविता सुचण्याचा नव्हे :). असेच लिहित राहा. - शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 04/25/2011 - 07:55 नवीन
अप्रतिम रचना!! पहीली कविता आहे असे अजिबात वाटत नाहीये! माझ्या मते काही विशेष बदल न करता फक्त सादरीकरण असे असावे:
असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे खडतर वाटेवर सापडेल कधी जिणे? कशासाठी कुणासाठी रडावे अपार काय सख्या आणले तू, काय तू नेणार ? रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या र्‍हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?
पुढील लेखनास अनेक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 04/25/2011 - 23:11 नवीन
मि कां ना अनुमोदन. छानच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा