Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्षण

न — निनाव, Sun, 04/24/2011 - 11:22
क्षण वाहणारे हातातून निसटणारे येतील का पुन्हा जुळून विसरता न येणारे क्षण भरणारे आठवणींतून झरणारे येतील का पुन्हा दाटून बु़जवता न येणारे क्षण चमकणारे निराशेस विझवणारे येतील का पुन्हा उजळून लपवता न येणारे कुणास ठाऊक ते येतील कधी धरतील हातात हात मैत्रीचे कधी मिठीस घेऊन एक्-मेकांस विसरणे चुकांस शक्य होईल का पुन्हा क्षण लांबणारे हवे हवेसे ते वाटणारे येतील का उतरून पुन्हा आयुष्यास ते हसवणारे - निनाव २४ अप्रिल २०११

प्रतिक्रिया द्या
1225 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
प्रकाश१११ Sun, 04/24/2011 - 11:30 नवीन
निनाव - कुणास ठाऊक ते येतील कधी धरतील हातात हात मैत्रीचे कधी मिठीस घेऊन एक्-मेकांस विसरणे चुकांस शक्य होईल का पुन्हा खूपच छान उतरले आहे हे सर्व ...!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 04/25/2011 - 07:48 नवीन
क्षण चमकणारे निराशेस विझवणारे येतील का पुन्हा उजळून लपवता न येणारे
सुंदर रचना!! यावरुन माझी एक रचना आठवली. देईन लवकरच!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/25/2011 - 16:17 नवीन
खुपच छान लिहिले आहे .. खुप आवडले .. असेच लिहित रहा... वाचत आहे...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 04/25/2011 - 20:39 नवीन
एकदम छान रचना आहे. शब्दात विरोध असूनही एकमेकांच्या जवळ आहेत. "कुणास ठाऊक ते येतील कधी धरतील हातात हात मैत्रीचे कधी मिठीस घेऊन एक्-मेकांस विसरणे चुकांस शक्य होईल का पुन्हा" हे कडवे शेवटी हवे होते का? अर्थात तो अधिकार तुमचा आहे कारण ती कविता तुमची आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 04/25/2011 - 22:50 नवीन
पाभे, आवर्जुन वाचल्या बद्दल, खूप आभार. तुमचे म्हणणे पटते , पण मुद्दाम हे कडवे शेवटी ठेवले नाहि.. कारण, शेवट पुन्हा त्याच ओळींनं/लयी नं करायचा होता मला.. ! उम्मीद आहे तुम्हास पटेल माझी भुमिका. पुन्हा, लिहिल्या बद्दल आभारी आहे पाभे.
  • Log in or register to post comments
A
ajay wankhede Mon, 05/09/2011 - 19:36 नवीन
क्षण वाहणारे हातातून निसटणारे येतील का पुन्हा जुळून विसरता न येणारे व्वा छान मित्रा ...आवडले ----------------------------------------------------------------------------------- बर्बादी यो का जष्न मनाता चला गया.. मै जिन्दगि का साथ निभाता चला गया.....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा