Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गवसला एक पाहुणा : लावणी

ग — गंगाधर मुटे, Mon, 04/25/2011 - 06:53
गवसला एक पाहुणा : लावणी पहाटलेली विभोर लाली उधाण वारा पिऊन आली मस्तीतकाया, धुंदीत न्हाया कशी उतावीळ झाली गं बाई उतावीळ झाली मन ऐकेचना, तन ऐकेचना जाई पुढे, पळते पुढे सांगू कुणा? मी सांगू कुणा? सखे गंsssss नजरेस माझ्या गवसला एक पाहुणा सखे गं मला गवसला एक पाहुणा ॥धृ०॥ माझ्या राजाची वेगळीच बात चाल डौलाची मिशीवर हात त्याचा रुबाब वेगळा तोरा तरी चालतोय नाकासमोरा बघा सूटबूट, कसा दिसतोय क्यूट लाजाळू कसा, टकमक बघेचना ॥१॥ माझ्या गड्याची न्यारी कहाणी स्पष्ट विचार, साधी राहणी जुने थोतांड देतो फ़ेकुनी नव्या जगाचा ध्यास धरुनी त्याला विसरेचिना, भूल पडेचिना सखे गं मना, चैन येईचना ॥२॥ जरी वरवर दिसतो तामस आत हृदयात दडलाय माणूस जातो अभय सदा धावून जनसेवेचे व्रत घेऊन तोच ठसला मनी, होईल माझा धनी लावा गं सखे, विड्याला काथ, चुना ॥३॥ . गंगाधर मुटे ...*.....**.....***.....****....***....**....*...

प्रतिक्रिया द्या
1135 वाचन

💬 प्रतिसाद (3)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 04/25/2011 - 07:50 नवीन
मस्त रचना! फक्त एक प्रश्न!
त्याला विसरेचिना, भूल पडेचिना
इथे विरोधाभास जाणवतोय! नक्की काय म्हणायचे आहे?
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 04/25/2011 - 20:45 नवीन
आमचंबी एक डबल पान कलकत्ता मिठा, कतरी सुपारी, किमाम, १२०/३००, चुना कम, हरीपत्ती
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 04/25/2011 - 23:18 नवीन
भारीच!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा