Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रीतीचा वर्षाव ...

A — ajay wankhede, Mon, 04/25/2011 - 20:40
प्रीतीचा वर्षाव प्रिये तू देऊ नकोस डोळयात अश्रूंना स्थान कारण अश्रू प्रीतीचा झरा आटवतो. प्रिये तू येऊ देऊ नकोस गालावर रक्त चंदन राग कारण राग प्रीतीचा झरा आटवतो. प्रिये तू करू नकोस ओठांवरून मद मत्सर तीक्ष्ण बाणांचा वर्षाव कारण मद मत्सर प्रीतीचा झरा आटवतो. प्रिये तू फक्त ऐवढेच कर..... तू हळुवारपणे केसांना मोकळे सोड , पाणीदार पापण्यांना हलकेच वर खाली कर , गोड गुलाबी गालांवर पारिजात फुलू दे , ओठांवरील रक्तिम लव हलकेच थरथरू दे, नि या जगावर प्रीतीचा वर्षाव कर . प्रिये फक्त तू ऐवढेच कर...

प्रतिक्रिया द्या
1523 वाचन

💬 प्रतिसाद (4)
र
रामदास Mon, 04/25/2011 - 20:48 नवीन
नक्की कसा रंग होईल याचा विचार करतो आहे. रक्तिम लव फेशलची ताबडतोब आवश्यकता आहे असे तर कविला सुचवायचे नाही ना ? नि या जगावर प्रीतीचा वर्षाव कर .ही कविता बहुतेक लेडी चॅटर्लीज लव्हरच्या नायीकेवर लिहीली असावी. वरील सर्व वाक्ये हलकेच न घेणे. झालंच तर ऐव्हढे ऐव्हढे म्हणजे कैव्हढे याचा पण विचार व्हावा.
  • Log in or register to post comments
A
ajay wankhede Sat, 04/30/2011 - 05:46 नवीन
-स्वामि राम दास राव धन्यवाद, आपण गुरु आहात . स्त्री जातीला निसर्ग ता च सौंदर्याचे जे वरदान मिळालेल आहे, त्या कडे कवी या नात्यानं डोळस पणे बघावं हा माझा हेतु. ''रक्तिम लव ''ओठांवरिल diamond किनार ''हे मला अभिप्रेत आहे. आपण कुठला विचार केला...कळ्वावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
न
निनाव Mon, 04/25/2011 - 21:15 नवीन
अजय, खूपच सुंदर कविता..मला खूप आवडली. मस्त लिहिले आहेस. सुंदरच. शब्दांची थोडी फेर फार करून बघितली.. आणिक मस्तच वाटली कविता. असेच छान येउदे अजुन. (अवांतरः संदेश बघ. काही सुझाव लिहिले आहेत.) - निनाव.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/25/2011 - 21:55 नवीन
"रक्त चंदन राग" व्वा नविनच शब्द मी पाहिला.. खुप आवडला ... या शब्दांची चोरी करावीशी वाटत आहे [:)]
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा