कलादालन

पोर्ट्रेट फोटोग्राफिचा एक प्रयत्न.

Primary tabs

नमस्कार मंडळी, श्री शरद यांचा "मिपावरील छायाचित्रे ... एक निरिक्षण" हा लेख वाचला आणि मला माझ्याकडे असलेली काही पोर्ट्रेट अपलोड करायचा मोह झाला. ही काही फार सुंदर छायाचित्र आहेत असं नाही म्हणता येणार पण त्या क्षणी मला जे कॅमेर्यात पकडावस वाटलं ते इथे मांडतोय. सासवड-जेजुरी च्या परिसरात फिरत असताना हा धनगर दिसला. यांची पागोटे घालण्याची पद्धत खूप मस्त असते. आणि मला सगळेच धनगर फोटोजेनिक वाटतात! Image removed. गोव्याला गेलेलो असताना समुद्रात खेळून आलेल्या आणि मग दमून स्वस्थ बसलेल्या एका लहान मुलाचा हा फोटो. आधी मला ती मुलगीच वाटली होती. त्याच्या घरच्यांनी माझा तो गैरसमज दूर केला. अतिशय गोड आणि निरागस चेहरा. Image removed. रंगीला.. बदामी ( कर्नाटक ) ला देवीच्या दर्शनाला गेलो असताना जत्रेच्या वेळी याचा फोटो मिळाला. Image removed. हम्पी ला या मुलीचा फोटो मिळाला. इतकी खळखळून हसत होती ती. Image removed. सासवड च्या एका मंदिरात ही स्त्री एका खांबाला टेकून बसली होती. तिच्या मुद्रेवर एक प्रकारचा करारी पणा दिसत होता. Image removed. बुलंद दरवाजा पाहायला गेलो असताना हा एक माणूस नुसता फुकट होता. एक संपली कि दुसरी बिडी पेटवायचा. मी फोटो काढत असताना त्यान एकदा थकलेल्या डोळ्यांनी माझ्या कडे पाहिलं आणि आपलं काम चालूच ठेवलं. Image removed. आमचा एक अतिशय झोपाळू मित्र. याला कुठेही, कधीही, कशीही झोप येऊ शकते. ट्रेन मध्ये झोपलेला असताना त्याच्या वरचा लाईट आवडला मला. खिडकीतून येणारा. Image removed. माझा एक फोटोग्राफर मित्र. हा मी मुद्दाम थोडा अंडरएक्सपोज ठेवला आहे. कारण मला फक्त त्याची त्या वेळची शारीरिक ठेवण आणि हातातला कॅमेरा एवढंच दाखवावास वाटलं. Image removed. राजगड ला एक दिवस जात असताना ही बाई दिसली. शेळ्या हाकताना. कपाळावरच कुंकू आणि नाकातली रिंग ( कोणाला त्याला नक्की काय म्हणतात सांगितला तर बर होईल) आवडली. Image removed. फोटो काढायला लहान मुल नेहमीच उत्सुक असतात. पण हा थोडासा लाजरा होता. शेवटी तो खांबाआड असतानाच त्याचा असा फोटो घेतला. Image removed. घोष पथकामधले एक आजोबा. त्यांचे थिजलेले डोळे, चेहऱ्यावरच्या वार्धक्याच्या खुणा आणि त्यांचा तो ड्रेस यात मला काहीतरी विसंगती सापडली. Image removed.
गवि

सर्वच फोटो अतीव सुंदर.

फारच आवडले.

यशोधरा

ऑफिसमधून दिसत नाहीयेत, घरुन बघेन :)

आचारी

क्यमेरा कोणता वापरता ते सान्गा ना...............

ऋषिकेश

काहि खूपच आवडले विषेशतः शेवटून २रा व ३रा
काही काहि छायाचित्रांमधे क्रॉपिंग +/किंवा एक्स्पोजर +/किंवा अँगल वगैरे बदलता यावे असे वाटले. आता घाईत आहे नंतर जमल्यास डिलेलवार मत लिहितो

५० फक्त

खुप मस्त फोटो रे, मला कधी येणार असे फोटो काढायला काय माहित ?

येडाखुळा

सर्वान्चे मनापासून आभार.

खादाड अमिता : नाही. मी प्रोजेक्ट ३६५ चा मेंबर नाही. प्रोजेक्ट ३६५ काय आहे हे मीच पहातो गुगलून. हा हा हा.

आचारी : क्यामेरा आहे निकॉन डी ६०.

ऋषिकेश : आपल्याकडून शिकायला आवडेल.

अनामिक

छान आहेत फोटू! आवडले, अजूनही असतील तर टाका की इथे.

स्मिता.

सगळेच फोटो आवडले... २रा आणि ७वा तर लई भारी!

गणेशा

फोटो दिसत नसल्याने फक्त प्रतिक्रियेवरुनच आनंद घेतला ....

धमाल मुलगा

मला दोन्ही मित्रांचे फोटो आवडले. ह्या दोन्ही फोटोंमध्ये प्रकाश-अंधाराचा छान खेळ केला आहे.

धनंजय

मात्र एकदोनच दाखवायला हवे होते!
फोटो छानच आहेत.

पाषाणभेद

छान फोटो आले आहेत.
फोटोशॉप वापरले आहे का?
तुमच्यामध्ये एक कलाकार दडलेला आहे.

यशोधरा

दोनही स्त्रिया आणि अंडर एक्स्पोझ्डवाला अधिक आवडले. छान फोटो.

स्पंदना

अंडर एक्स्पोझ्ड फारच छान !

बाकिचे ही छान्च.

सासवडच्या मंदिरातल्या स्त्रीचं छायाचित्र आवडलं. सहसा लोक दाखवत नाहीत असं काहीतरी एका क्षणात पकडता आलं आहे असं वाटलं. कार्तिए-ब्रेस्साँची 'Decisive Moment' ही संकल्पना आठवली.

अवांतर: मूळ फोटोंमधला अ‍ॅस्पेक्ट रेशो बरोबर आहे, पण इथल्या प्रतिमांमध्ये तो बरोबर नाही. जमल्यास दुरुस्त करा.

चिगो

सगळेच फोटो मस्त.. जबरा पोर्ट्रेट्स आहेत..

सगळेच फोटो क्लास आलेत ,
मला ह्यातल फारस माहिती नाही पण
माझा मते चेहरा / डोक पूर्ण दिसल पाहिजे ! जे इथे काही फोटोत होत नाहीए

वपाडाव

प्रत्येक चित्र गुंतवुन ठेवु पाहत होते....