Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बोल ना रे बाबा काही ..४ ( समाप्त )

ग — गणेशा, Tue, 04/26/2011 - 19:13
मनोगतः बापाच्या जाण्याने दु:खी झालेल्या लेकीचे(कवितेचे) हे काव्य ... समाजातील अश्या असंख्य दयनिय अवस्थेतील मिटल्या पापण्यात स्वप्ने दडलेल्या शेतकरी बापाचे चित्र सहज लिहिले गेले.. तुमच्या सर्वांचे आभार त्यासाठी तुझ्या डोळ्यात बरसुन... कोरडीच ही कविता आसवांच्या ओळीत... गच्च भिजलेली ही कविता मिटल्या पापण्यांच्या स्वप्नात... अडखळणारी ही कविता तुझ्या आठवांच्या थेंबात.. हेलावणारी ही कविता ...............माझे माहेर देऊळ ...............तुच होता मायबाप ...............क्षीण नसे कधी भाव ...............तेथे होते पिर्तीचे गाव ...............बोल ना रे बाबा काही ...............सांग ना रे काही ...............रडवेली लेक तुझी ...............सांग कुठवर जाई रात्रीच्या गच्च पहार्‍यात... तव आठवांची ही टिपुस कविता वेदनेच्या अस्तित्व डोहात...खोल बुडालेली ही कविता डोंगरायेव्हड्या दु:खात सार्‍या... तुझ्यासाठी हसणारी ही कविता तुझ्या साठी आज मात्र... शेवटचं रडणारी ही कविता ...............प्राजक्ताच्या फुलांनी ...............दिले सर्वस्व झोकुनी ...............चालावे का मी तुझ्यामागे ...............सांग त्याच वाटेनी ...............बोल ना रे बाबा काही ...............सांग ना रे काही ...............रडवेली लेक तुझी ...............सांग कुठवर जाई ...............रडवेली लेक तुझी ...............सांग कुठवर जाई --शब्दमेघ ( २६ एप्रिल २०११) ३. नको येवुस कविते :- http://www.misalpav.com/node/17751 २. नको बोलु बाबा काही :- http://www.misalpav.com/node/17097 १. हरवली पोर माझी कविता नावाची :- http://www.misalpav.com/node/17082

Book traversal links for बोल ना रे बाबा काही ..४ ( समाप्त )

  • ‹ नको येवुस कविते( ३)
  • Up

प्रतिक्रिया द्या
3218 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पाषाणभेद Tue, 04/26/2011 - 20:57 नवीन
लेकीचे दु:ख समजले. छान काव्य आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Wed, 04/27/2011 - 03:37 नवीन
गाणेशा - छान लय मिळालीय कवितेला रात्रीच्या गच्च पहार्‍यात... तव आठवांची ही टिपुस कविता वेदनेच्या अस्तित्व डोहात...खोल बुडालेली ही कविता आवडली मस्त !!
  • Log in or register to post comments
न
निनाव Wed, 04/27/2011 - 07:01 नवीन
गणेशा, अबोल झालो मी. मला काय प्रतिसाद द्यावा कळत नाहिये. थोड शऑक मधेच आहे अजुन कविता वाचल्या वर. - निनाव.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 04/27/2011 - 07:30 नवीन
परत एकदा तुफान आणि भन्नाट!! परत एकदा __/\__ तुम्हाला!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 04/27/2011 - 12:25 नवीन
मनापासुन धन्यवाद सर्वांचे .. तुमच्यामुळेच बर्याच दिवसानी असे मनसोक्त लिहिले मी ... छान वाटले ...
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 04/27/2011 - 12:49 नवीन
रदवेली लेक तुझी सांग कुठवर जाई? गणेशा फारच छान, मागच्या येउ नको म्हणुन साम्गणार्‍या बापाला हे खरच चांगल उत्तर आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 04/28/2011 - 12:08 नवीन
धन्यवाद .. पण कवितेतील उत्तर छान असले तरी लेकीला बाप नसताना उत्तर देताना खुपच वाईट वाटले .. लिहितानाही सुन्न झालेलो मी.. जर असे कधी घडले असेल कोणाकडे तर , या कल्पनेनेच वाईट वाटले ... आनि आज ऑफिसल येताना "शिक्षणाच्या आयचा घो" मधील "घे समजुन या बापाला" हे गाणे ऐकले खुपच गहिवरुन आले.. या पिक्चरच्या नावाच्या गडबडीत हे गाणे बर्यापैकी दुर्लक्षीत राहिले आहे कदाचीत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा