Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काल रात्री

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Wed, 04/27/2011 - 07:49
थोडी प्रस्तावना: पाऊस येणार असला तर त्याला एक घटनाक्रम असतो. प्रथम दाटून येते, मग हळूहळू गारठा जाणवायला लागतो, त्यानंतर पाऊस सुरू होऊन सगळं जलमय होत जाते, वाहायला लागते आणि वाहता वाहता विरघळायला लागते. या सर्व घटनाक्रमात क्रमाक्रमाने विरहात झुरणार्‍या नायकाच्या मनाची अवस्था आणि त्याचे विचार या रचनेत मांडायचा प्रयत्न आहे. ====================================== परत एकदा स्व:तास केले स्वप्नांच्या आधीन | .......... काल रात्री || परत एकदा जीवास केले सखेच्या स्वाधीन | .......... काल रात्री || या रिकाम्या घरात धडपडतांना | सैरभैर तुझ्या शोधात फिरतांना | खिडकीत बसून तुझी वाट पाहतांना | कळले कि सारे सारे मेघ दाटून आले .......... काल रात्री || नुरली कुठलीही भानाची वस्त्रे | थरारली शहारली देहाची गात्रे | चालवली सांजवेळी वेदनेची सत्रे | वाटले कि सारे सारे गारठून गेले .......... काल रात्री || खिडक्यांचे गज मजबूत काळे | समोरील चाफ्याचे नाजूक फुल कोवळे | अन् इथे माझे थकलेले हताश डोळे | बघ सखे कसे सारे सारे जलमय झाले .......... काल रात्री || जळावर आरुढलेली, जमीन सोडलेली माती | खिडकीबाहेर पडलेली सर्दून विझलेली पणती | कठड्यावर उगवलेली काही आगंतुक गवताची पाती | पाहिलेस कसे सारे सारे वाहून गेले .......... काल रात्री || या घराचे जीर्ण गळके छत | पोपडे उडालेल्या भिंतींच्या रंगाचे पोत | त्या पणतीची पोरकी झालेली वात | समजलेच नाही कधी हे सारे सारे विरघळून गेले .......... काल रात्री || खूप आतून जाणवले सखे तुझ्या असण्याचे महत्व | मी मात्र उगाच मिरवत होतो प्राक्तनावरचे स्वामित्व | शेवटी विरघळलेल्या वातीत जाणवतेच ना कापसाचे अस्तित्व | हेच ते हेच.... जे मला सारे सारे कळून गेले .......... काल रात्री || |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२७/०४/२०११)

प्रतिक्रिया द्या
3421 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
प्रकाश१११ Wed, 04/27/2011 - 09:55 नवीन
या घराचे जीर्ण गळके छत | पोपडे उडालेल्या भिंतींच्या रंगाचे पोत | त्या पणतीची पोरकी झालेली वात | समजलेच नाही कधी हे सारे सारे विरघळून गेले .......... काल रात्री || छान आणि मत लिहिलेय !!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 04/27/2011 - 12:29 नवीन
खुप आवडली कविता .. पाउस आनि विरहवीराची मनाची स्थीती अप्रतिम विनली आहे तुम्ही .. शब्द न शब्द आवडला .. वाचनखुण साठवुन ठेवली आहे ..
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Wed, 04/27/2011 - 13:43 नवीन
छान लिहिले आहे .
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 04/27/2011 - 13:45 नवीन
स्तुत्य.. एवढेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 04/27/2011 - 13:45 नवीन
स्तुत्य.. एवढेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 04/27/2011 - 13:56 नवीन
वा चांगली जमली आहे ही कविता. मुक्त म्हणायचा का छंदही? पण ते टिंब कमी करण्याचे मनावर घ्या बॉ जरा. 'म्हण्जे ...........रात्री' ऐवजी विदाउट टिंब 'रात्री' पण चालेल.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 04/28/2011 - 08:22 नवीन
अहो, ती टिंब एवढ्याकरता आहेत की कविता वाचतांना त्याठिकाणी मला एक छोटा पॉज अपेक्षीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद
न
निनाद Fri, 04/29/2011 - 05:36 नवीन
पॉज म्हणजे विराम, म्हणजे तुम्हाला स्वल्पविराम अपेक्षित आहेत का? वाचण्याचा पॉज वाचकाला ठरवू देत असे मला वाटते! टिंबांचा वापर म्हणजे नवकवी असल्याची लक्षणे मी मानतो. तुम्ही तर जुने कवी आहात, म्हणून म्हणतो; का वाचकांचा वेळ मोडा आता टिंबे सोडा| सुटे थांबण्याचा तिढा विरामचिन्हे जोडा||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/28/2011 - 14:28 नवीन
चांगली कविता..!
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 04/28/2011 - 15:56 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 04/28/2011 - 20:17 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 04/28/2011 - 20:20 नवीन
एकदम मस्त आहे
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द गुरुवार, 04/28/2011 - 20:31 नवीन
ओये मिका... खासच!! वेड...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/29/2011 - 05:15 नवीन
छान...
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 04/29/2011 - 05:40 नवीन
कालच्या रात्रीची का ? ही तर रोजच्या रात्रीची कविता आहे. आवडली. पण लाल मेंदी दिवसेंदिवस गडद काळी का होते आहे ?
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 04/29/2011 - 05:41 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Fri, 04/29/2011 - 07:09 नवीन
छान रे गझल वाटतेय का ही.
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 04/29/2011 - 07:40 नवीन
कविता नव्हे, ही गझल; सांगा मिकाला पण तो नाही म्हणतो, गझल करायला | जमत नाही म्हणे नाट्य आणायला नि शब्दांच्या मालगाड्या पाठवायला || ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी
क
किसन शिंदे Fri, 04/29/2011 - 07:38 नवीन
एवढं सगळं कसं सुचतं राव तुम्हाला??? लय भारी!!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 04/29/2011 - 11:13 नवीन
सर्वांना धन्यु :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा