Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हे कधी बदलणार?

उ — उदय के'सागर, Fri, 04/29/2011 - 07:30
नमस्कार, मी पहिल्यान्दाच मिपा वर काहि प्रकाशीत करतोय, इथे प्रकाशीत होणारे साहित्य दर्जेदार आहे, त्यामानाने माझी ही कविता कादाचीत खुपच साधारण वाटेल किन्वा उगीच यमक जुळवण्याचा प्रयत्न वाटेल, पण I think this how I will learn from your comments. हे कधी बदलणार? एकविसाव्या शतकातही मुलींचं अस्तित्वं अत्याचाराने तडपलेलं असतं कारण आजही नवं-तरुणांच मनं हुंडयाच्या वासनेत अडकलेलं असतं देशाच्या संस्कृतीचा अभिमान मिरवताना वृद्धाश्रम मात्रं भरलेलं दिसतं ही का त्यांचीच चुक, कमावलेलं सारचं त्यांनी मुलांमधेच पेरलेलं असतं ? कुठेतरी पटतय नव्या पिढीला, जगण्यासाठी लागतो तो फक्तं श्वासचं नसतो उपयोग काय? नविन नि वेगळ कही करण्यावर पालकांचा विश्वासच नसतो सत्य आणि न्याय नेहमीच पैसा नि दादागिरिच्या आड़ लपलेलं असतं धाव घेउन घेणार कुठे? जेंव्हा हे सरकारच भ्रष्टाचाराने करपलेलं असतं आमच्या रोजच्याच समस्येंच मुळ नेहमी कुठलतरी पक्षच असतं बस्स! एवढच बोलून मग मुळ समस्येकडे कोणाचं लक्षच नसतं "हे कधी बदलणार?” सारखे प्रश्न नुसत्या संवादापलीकडे कधी वळतच नाही बदल हवेत? मग आधी स्वतः बदल, ही साधी गोष्टं प्रश्न कर्त्याला कळतच नाही

प्रतिक्रिया द्या
1954 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 04/29/2011 - 07:42 नवीन
भरपूर वाचा! अजुन लिहा!! पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 04/29/2011 - 08:14 नवीन
चांगली आहे कविता... पु.ले.शु.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 04/29/2011 - 11:22 नवीन
छान संदेश देत आहे कविता ... लिहित रहा ... वाचत आहे...
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 04/29/2011 - 12:01 नवीन
छान लिहिल हो तुम्हि :)
  • Log in or register to post comments
व
विदेश Sat, 04/30/2011 - 08:16 नवीन
प्रयत्न स्तुत्य आहे. कवितेचा आशय चांगला आहे. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 04/30/2011 - 08:20 नवीन
बदलेल ...अण्णांच्या मागे उभे रहा ....
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 04/30/2011 - 08:32 नवीन
बदलेल ...अण्णांच्या मागे उभे रहा ....
तुम्हाला पाठीशी म्हणायचे आहे का? 'मागे उभे रहा' जरा विचित्र वाटते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
प
पिवळा डांबिस Sat, 04/30/2011 - 20:32 नवीन
बदल हवेत? मग आधी स्वतः बदल, ही साधी गोष्टं प्रश्न कर्त्याला कळतच नाही क्या बात है!! जियो!!! पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
उ
उदय के'सागर Mon, 05/02/2011 - 12:57 नवीन
मी खरच मनापासुन सर्वान्चे अभार मानतो :) मला खरच एकाही प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती, पण ८ प्रतिक्रिया पाहुन मला खुप सही वट्तय :) Thanks you so much you all for such a motivation and inspiration. I will keep writing now and that is only because of you :)
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 05/03/2011 - 02:17 नवीन
कवीतेत काय तरी कमी हाय......
  • Log in or register to post comments
A
ajay wankhede Wed, 05/04/2011 - 17:29 नवीन
उत्तम सुरवात .. शब्द च क्रान्ति करतात. अजुन खुप लिहा. मि पण नवाच आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा