वाडा
वाडा
जुन्या जाणत्या भल्या थोरल्या गोष्टी सार्या सरल्या
खोबणीत पांढरे झाले डोळे, जाणीवा जणू मेल्या ||१||
काळोखाच्या गर्दीमध्ये हरवले त्याचे दिसणे
कुठे पाहुनी कसे वदावे, वर्णन या मुखाने ||२||
डोळ्यांत घातले अंजन जरी, न दिसे जमीन खाली
कुरकुरणार्या दरवाजांवर कड्याकुलूपांनी नक्षी केली ||३||
ओट्यावरचे दगड कालचे, चालले पायात खाली
खांबांवरची कोरीवकामे अजगरासम सरपटली ||४||
ओलावलेल्या भिंती ल्याल्या रंगांचे उडते पोपडे
कंदील नाही उजेडाला म्हणून काळवंडले कोनाडे ||६||
डुगडुगणार्या जिर्ण पायर्या जिना वर घेवून चालला
निखळलेले लाकूड कधीचे आता न देई आधार हाताला ||७||
हादर्याने पडते खाली पाटाईतून भुरभुर माती
तिलाही आता घाई झाली मातीतच जाण्याची ||८||
खोल्या असतील अनेक जरी, लागून एकमेकांना
सख्या बहीणी शोभत होत्या, भिंत भिंतीच्या पाठीला ||९||
कित्येक कुटूंबे येथे आली, वेलीवर फुले फुलवून गेली
आधारवड आता कोसळू पाहे, बांडगूळांची चैन झाली ||१०||
कधी काळचे वैभव थोर, गेले आज लयाला
विरपुरूष जणू सैन्यातला, शर्थ केली लढायला ||११||
आता लगेच पाडतील जुन्यापान्या विस्तीर्ण वाड्याला
मढ्यावरचे लोणी आयतेच मिळे इमारत बांधणार्याला ||१२||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०४/०५/२०११
💬 प्रतिसाद
(5)
व
विदेश
Wed, 05/04/2011 - 13:53
नवीन
वाडयाच्या वर्णनात १० आणि १२ जास्त वास्तववादी वाटले.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Wed, 05/04/2011 - 14:15
नवीन
चर्र् झाले मन वाचुन
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 05/04/2011 - 14:30
नवीन
पाभे अशा चुकीच्या मार्गाला गेलेले पाहून वाईट वाटले.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 05/04/2011 - 15:30
नवीन
तुमच्या प्रतिभेतील हा अनाखि एक पैलु..
लिहिण्याची पद्धत आवडली.. आधीपेक्शा खुप वेगळी लेखनपद्धत तरीही मनात घर करुन जाणारी ...
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 05/05/2011 - 03:39
नवीन
पाभे परत एकदा लिहा. एक शब्द ही न बदलता फक्त शब्दांची जागा बदलुन लिहा. अतिशय उत्तम काव्य!! थोडस काम करा यावर फिरुन.
- Log in or register to post comments