Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चोरून चोरून, हो ना?

उ — उदय के'सागर, Wed, 05/04/2011 - 16:31
कधी कधी हलकासाच पेपर उचलून मुद्दाम त्यावरच भाजी चिरून कधी उगाच रद्दी निट रचून नि रचेलेली रद्दी मुद्दाम पाडून        चोरून चोरून तू वाचतेस, हो ना? कधी धूळीवर, झाड़त असतांना कधी भांडयांवर, ते घासतांना काचेवर खिडक्या पुसतांना तर पानांवर पाणी घालतांना        चोरून चोरून तू लिहितेस, हो ना ? कधी ते "तेलकट रंग" भिंतींच्या अडून कधी त्या "पेंसिल" तिरक्या डोळ्यातुन कधी ती "पुस्तकं" अरशाच्या नजरेतून तर कधी "वह्या" फरशिच्या प्रतिबिम्बातुन        चोरून चोरून तू बघतेस, हो ना? बापरे! किती गं रोज रोजची तुझी चोरी ही वाटलं होतं प्रमाणिक कामवाली छोरी ही चोरी ती चोरीच, शिक्षा हवीच प्रत्येक चोरीला विचार करतोय अता "शिक्षा" द्यावीच ह्या पोरीला :) ("शिक्षा" = शिक्षण)        ए! चोरून चोरून हेही ऐकलस, हो ना ? :)

प्रतिक्रिया द्या
2173 वाचन

💬 प्रतिसाद (8)
र
रामदास Wed, 05/04/2011 - 16:46 नवीन
सर्व शिक्षण अभियानाच्या प्रसारासाठी छान आहे पण प्रचारकी कविता नाही वाटत याचा आनंद वाटला.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/04/2011 - 17:20 नवीन
खुप आवडली कविता .. मस्त एकदम .. किती सुंदर शब्दात छान सांगितले आहे तुम्ही... असेच लिहित रहा... वाचत आहे...
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 05/04/2011 - 17:34 नवीन
हा हा मस्त!!! सुंदर विचार.
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Wed, 05/04/2011 - 18:07 नवीन
आवडली कविता पुर्ण वाचल्यावर च कळले तुम्हाला काय सांगायचेय ते. शिक्षा शब्दावरची कोटी पण मस्त
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 05/04/2011 - 20:06 नवीन
अरे चोरा, ती वाचत होती अन तू तिच्याकडे चोरून चोरून पाहत होतास काय? अं? वहिनींना सांगायला लागेल की एवढी कामवाली छोरी काढून टाका अन बाई लावा म्हणून!! :-)
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 05/04/2011 - 20:34 नवीन
हा हा हा!!!!!! बाकी कविता वेगळीच आणि आवडली हेवेसांनल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
पिवळा डांबिस Wed, 05/04/2011 - 23:21 नवीन
चांगली आहे कविता! आवडली!!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 05/05/2011 - 06:29 नवीन
आवल्डी कविता....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा