Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुख

स — सोनल कर्णिक वायकुळ, Wed, 05/04/2011 - 19:05
माझे असंख्य तुकडे करत खुशाल ह्याच्या त्याच्या झोळीत टाकत होतास ते मिरवत होते माझी लक्तर मूर्खांच्या नंदनवनात आणि तू तुझ देवपण. तुझ्या पायांशी तेव्हा रास पडली होती नमस्कारांची, फेडलेल्या नवसांची, अन थातूर मातुर अर्जांची आणि त्यांच्या हातात होते सुखाचे असंख्य अश्रूबंबाळ दुःखी तुकडे दोन्हीही चक्रवाढ व्याजाने वाढत जाणारे…

प्रतिक्रिया द्या
1571 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ग
गणेशा गुरुवार, 05/05/2011 - 08:15 नवीन
अप्रतिम लिहिले आहे.. खुप आवडले ... सुखाचे दु:खी मनोगत कल्पनाच मस्त
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 05/05/2011 - 08:20 नवीन
लवकरात लवकर पुस्तक कवितासंग्रह अशा फॉर्मॅटमधे निघू दे. म्हणजे प्रवासात किंवा कुठेही जाताना सदैव सोबत घेऊन जाता येतील तुझ्या कविता. सोनलकडून अजून एक अत्यंत वाचनीय क्रिएशन. कविता म्हणतानाही याला काहीसे उणावल्यासारखे वाटते. कविता हा शब्द सामान्य आहे. तुझ्या रचना त्यापलिकडच्या असतात बर्‍याचदा. ही पण तशीच. लगे रहो..
  • Log in or register to post comments
स
सोनल कर्णिक वायकुळ Fri, 05/06/2011 - 08:46 नवीन
पुस्तक ? अजुन बरीच उन्ची गाठायचि आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
नगरीनिरंजन गुरुवार, 05/05/2011 - 08:27 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा