Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खेळ काळाचा....

ह — हर्षद प्रभुदेसाई, गुरुवार, 05/05/2011 - 18:56
थोडासा विचार केलात तर तुमच्या एक गोष्ट लक्ष्यात येईल... की... आपलं हे आयुष्य फक्त, तीन कोनांच्या कोनाड्यात कोंडलेलं असतं । जसं भूत आणि भविष्या मध्ये, हे वर्तमान घुसमटत असतं । ह्या तिघां मध्ये चालू असतो एक अजबच खेळ... वर्तमान धावत असतो जणू, भविष्यास त्या गाठण्या साठी । पण भूत अडवून धरतो त्यास..., भविष्यात त्याने ह्याला विसरूनये ह्यासाठी । पुढे-पुढे जरा जास्तच रंगत जातो हा खेळ... वर्तमान जातो थकून, धावता-धावता त्या भाविष्या कडे । मग भूत येऊन म्हणतो त्यास..., थकला असशील तर.. येउन जा थोडावेळ माझ्या कडे । आयुष्यभर असाच खेळला जात असतो हा खेळ... वर्तमान गाठतोय.. तोवर ते भविष्य, बरंच लांब निघून गेलेलं असतं । आणि पाठीमागे राहिल्या त्या भूताचं मात्र, दिवसेन-दिवस वय हे... वाढतंच असतं । थोडक्यात काय.. ह्या तिघां मधला व कधीही न संपणारा असतो हा खेळ... कारण.. त्या भविष्यास ह्या वर्तमानाला, काहिलेल्या गाठता येत नाही । कितीही थकला तरी वर्तमान काही, त्याच्या मागे धावणं थांबवत नाही । आणि भूत देखील वर्तमानाची पाठ ही कधीच, सहजा-सहजी तरी सोडत नाही । ह्या साऱ्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्ष्यात आली का?... हे तिघे तीन नाहीत, हा तो एकच आहे । वर्तमानात असलेला तोच, त्या भविष्यात येणारा एक वर्तमान आहे । आणि ओलांडून गेल्यावर भविष्यास, मागे उरला तोच तो भूत आहे । म्हणजेच.. ह्या तिनही भूमिका बजावणारा, एकमेव तो काळ आहे ।
हर्षद अ. प्रभुदेसाई.....

प्रतिक्रिया द्या
840 वाचन

💬 प्रतिसाद (1)
न
नरेशकुमार Fri, 05/06/2011 - 01:41 नवीन
कविता छान आहे. जिवनाचे कोडे उलगडुन सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा