Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक संध्याकाळ अशी....

ह — हर्षद प्रभुदेसाई, गुरुवार, 05/05/2011 - 19:00
एक संध्याकाळ अशी...., गजबजाटात हरवलेली । गप्पा-टप्पांमध्ये मित्रांसोबत, हसत-खेळत घालवलेली । एक संध्याकाळ अशी...., दुःख सारे ते विसरलेली । सुखद साजिऱ्या क्षणांनी, तुडूंब भरून वाहिलेली । एक संध्याकाळ अशी...., डोळ्यां मध्ये ह्या साचलेली । मिटूनयेत म्हणता डोळे, ओघळुन खाली ती सांडलेली । एक संध्याकाळ अशी...., खाण्या-पिण्यात गुंतलेली । टेर खेचत एक-मेकांची, हास्य-विनोदात गुंगलेली । एक संध्याकाळ अशी...., रंगात साऱ्या ह्या रंगलेली । रंग..संगतीत मिसळून असे हे, चित्र देखणे ते साकारलेली । एक संध्याकाळ अशी...., सरता-सरता थांबलेली । पुन्हा येईल का..? अशी ती, प्रश्‍नावर..अडून ह्या राहिलेली । एक संध्याकाळ अशी...., संपूच नयेशी वाटलेली । संपल्या वरही मनात माझ्या । रेंगाळत अशी ती राहिलेली । हर्षद अ. प्रभुदेसाई.....

प्रतिक्रिया द्या
4637 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा