Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझी आठवण येते....

ह — हर्षद प्रभुदेसाई, गुरुवार, 05/05/2011 - 19:03
तुझी आठवण येते.... कितीही विसराव अस म्हणालो तरी, का..? कुणास ठाऊक पण...। तुझी आठवण येते.... एकट्यानेच चालताना वाटेवरूनही, तू सोबत असल्याची खोटी जाणीव होते आणि मग...। का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते.... अचानक येऊन जातो एखादा मिस कॊल ह्या मोबाईलवर, आणि तो तुझा नसल्याची खंत वाटून जाते आणि मग...। का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते.... कुठून तरी एखादा आवाज कानी येतो खोलवर जाऊन ह्या हृदयाला भिडतो, आणि तूच पलीकडे असल्याचे तो भासवून जातो आणि मग...। का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते.... धावता-धावता ही नजर कुठेतरी खिळते कुणालातरी पाहून ती क्षणभर थांबते, तु नसल्याची खूण पटेसतोवर ती-त्या कुणाचा पाठलाग करत जाते आणि मग...। का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते.... नव्या-नव्या वाटसरुंशी गाठ-भेट होते त्यांच्यात माझी नजर तुलाच शोधू पाहते, आणि कुणात तरी मला तुझी झलक दिसून जाते आणि मग...। का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते.... कुणाशी तरी बोलता-बोलता गाडी रुळावरून घसरते जुन्याच स्टेशनांवर जाऊन ती..पुन्हा एकदा बिघडते, गप्पा-टप्पांच्या मैफिलीत मग आठवणींची उजळणी होते आणि मग...। का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते.... हर्षद अ. प्रभुदेसाई.....

प्रतिक्रिया द्या
1541 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा