सूर्यास्त
त्याच्या नजरेतला उग्र भारदस्त दरारा
जरासा सौम्य झाला काय आणि
सगळा नूरच पालटला.
रंगांच्या उत्सवात
तारकांच्या मांडवात
तो उभा होता क्षितिजावर
स्वतःच्या निवृत्तीचा सोहळा पाहात.
💬 प्रतिसाद
(2)
श
शुचि
Fri, 05/06/2011 - 13:32
नवीन
सुंदर!!!
सूर्य ..... या विषयावर अजून येऊ द्यात.
ही कविता वाचनीय आहेच.
- Log in or register to post comments
ग
गवि
Sat, 05/07/2011 - 03:07
नवीन
mast...jhakkas..
- Log in or register to post comments