Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जर तू असता तर

न — नगरीनिरंजन, Fri, 05/06/2011 - 10:19
जर तू असता तर तुला दिसले असते सुरे घेतलेले हात कल्ले कापलेलं शरीर निळ्याशार पाण्यातला लाल ढग तुला दिसले असते अजस्त्र शरीरावरचे निर्जीव भासणारे डोळे दिसलीही असती त्यात वेदना पण नसती दिसली दया याचना जर तू असता तर तुला दिसले असते काळे पिवळे पट्टे आणि त्यावर लाल जखमा भेदरलेले गोड बछडे आणि जमिनीवर आपटलेली शेपटी दिसले असते तुला थंड भासणारे हिरवे-पिंगट डोळे क्रोधाचा पेटलेला त्यात वणवा पण तुझ्या प्रार्थनेची वानवा जर तू असता तर तुला दिसले असते कुर्‍हाडीचे घाव सोसणारे महाकाय मूक वृ़क्ष चूड घेतलेल्या हातांनी पेटवलेले भीषण वणवे उघडे बोडके डोंगर त्यावरचे तुझे मंदिर आणि हातापाया न पडता समोर कोसळणारी झाडे जर तू असता तर तुला दिसले असते क्षुद्र मुके जीव मानाने जगणारे मरण येईपर्यंत आयुष्याशी झगडणारे जर तू असता तर उचलले असतेस तुझे चक्र, वज्र, त्रिशूळ, तलवार आणि छाटली असतीस समोरची झुकलेली मुंडकी लाचार

प्रतिक्रिया द्या
2910 वाचन

💬 प्रतिसाद (13)
श
शुचि Fri, 05/06/2011 - 13:25 नवीन
अप्रतिम कविता आहे. फारच सुंदर. परत वाचली. प्रत्येक कडवं हृदयाला पीळ पाडणारं आहे.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 05/06/2011 - 23:30 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 05/07/2011 - 23:59 नवीन
अफाट!! प्रत्येक कडवं आर-पार घुसलं. खूप सुंदर!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 05/09/2011 - 05:40 नवीन
नगरी सलाम!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 05/09/2011 - 08:10 नवीन
शुचि, पाभे, प्राजु, अपर्णा, मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
म
मनिष Sun, 09/04/2011 - 09:57 नवीन
जर तू असता तर तुला दिसले असते कुर्‍हाडीचे घाव सोसणारे महाकाय मूक वृ़क्ष चूड घेतलेल्या हातांनी पेटवलेले भीषण वणवे उघडे बोडके डोंगर त्यावरचे तुझे मंदिर आणि हातापाया न पडता समोर कोसळणारी झाडे!!!
अप्रतिम, अफाट!!! खूप, खूप आवडली!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Sun, 09/04/2011 - 09:59 नवीन
खूप चटका लावणारं लिहिलय राव
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 09/04/2011 - 13:32 नवीन
हेच विचार मनांत येत असतात पण तुमच्यासारखे इतके सुंदर शब्दात नाही गुंफता येत. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/04/2011 - 15:20 नवीन
सुरेख... :)
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sun, 09/04/2011 - 15:41 नवीन
सुंदर कविता !!! आजचं दाहक वास्तव नेमक्या शब्दांत उतरवलं आहे...
  • Log in or register to post comments
न
नंदू Sun, 09/04/2011 - 16:02 नवीन
अप्रतिम कविता!
  • Log in or register to post comments
स
स्पा Sun, 09/04/2011 - 16:09 नवीन
:( मस्त आवडली
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 09/05/2011 - 11:28 नवीन
कविता भावली. अश्याच येऊ द्यात आणखी.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा