तगमग

जगण्यासाठी इतकी दगदग
श्वास घेतला, जाणवली धग

होकाराचे आढेवेढे!
आधी किंवा आत्ता वा मग

फुकट भाषणे, उधार वक्ते
विकत घेतले श्रोत्यांचे नग

इथे किती गजर्‍याची बोली?
इथे कशी पदराची लगबग?

सुचले नाही काही क्षणभर
नुसती तगमग तगमग तगमग

जगण्यासाठी इतकी दगदग
श्वास घेतला, जाणवली धग

होकाराचे आढेवेढे!
आधी किंवा आत्ता वा मग

ह्या दोन द्विपदी विशेष भावल्या.

(अशोककुमारच्या 'रेलगाडी रेलगाडी' च्या चालीत फिट्ट बसतंय! :))
चतुरंग

वा ॐकार,

सहजसुंदर ओघवती ग़ज़ल. चांगली आहे. बर्‍याच महिन्यांनी जवळपास वर्ष-दीड वर्षांनी तुझी ग़ज़ल वाचली. समाधान वाटले.

बेलाशी आम्ही सहमत आहोत. तुझे इतर काव्य ज्यांनी वाचले आहे, त्यांचे मत बहुधा तसेच असणार. पण त्यात वैषम्य वाटण्यासारखे काही नाही. प्रत्येक ग़ज़ल पराकोटीच्या उंचीला नेणे ग़ालिबलाही जमलेले नाही. म्हणूनच

रेख़्तेके तुम ही उस्ताद नही हो 'ग़ालिब'
कहते है अगले ज़माने में कोई मीर भी था...

असे त्यांनी लिहिले असावे. असो.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

आपला,
(आस्वादक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com