कलादालन
तत्काळ चित्रकार ( Instant Artist) बना.
Primary tabs
झटपट चित्रकार
फोटोशॉपचा असाही उपयोग मध्ये आपण त्यात चित्रे कशी काढता येतात ते पाहिले. पण त्यात मी एक अट घातली होती .."इच्छा व वेळ पाहिजे ". आता इच्छा बर्याच जणांना असली तरी हल्लीच्या धकाधकीच्या काळात "वेळ" कसा पैदा करणार ? तर आज पाहूं वेळ नसणार्या लोकांनाही "Instant Atist " कसे बनता येते. फोटोशॉपने त्यांचीही सोय केली आहे.पुढे दिलेली चित्रे मुद्दाम काळजीपूर्वक निवडलेली नाहीत. प्रत्येक चित्राला साधारणत: ३ ते ४ मिनिटे लागतात. एवढा वेळ कोणालाही काढता येईल.
चित्रकार खडू-कोळसा, पोस्टर कलर्स, पेंट डॉब्ज, इत्यादी निरनिराळ्या पद्धतीचे चित्रे काढतात. तुम्हाला यातील कोणतीही पद्धत निवडता येते. पाहिजे तर एक चित्रच अशा वेगवेगळ्या पद्धतीने काढता येते. पद्धत एकदम सोपी.
(१) कोणताही फोटो (तुम्ही काढलेला वा ढापलेला) फोटोशॉपमध्ये उघडा.
(२) Filter क्लिक करा.
(३) Fly 0ff मध्ये Artistic, blur, brush strokes. इत्यादी ऑप्शन्स मिळतील. प्रत्येकात निरनिराळ्या पद्धतींची नावे आहेत. हीच ती वॉशिंग्टनची कुर्हाड. OK दाबा. फोटोचे पेंटिन्ग होईल.चित्र कसे दिसते ते बघा. edit मध्ये dilit-redo करा. पहिला फोटो मिळेल; त्यावर दुसरा effect वापरा.
(४) पहिल्या दिवशी काय effects मिळतात याची कल्पना येईल. दुसरा एखादा फोटो घेऊन काय करता येते त्याची ओळख करून घ्या.
(५) प्रत्येक प्रकारात कमी जास्त बदल करता येतो. त्यांच्याशीही खेळ करा.
(६) बस. तांत्रिक भाग संपला. या पुढे तुमची कलात्मक जाण.
(७) काही चांगली "चित्रे" (फोटो नव्हेत) इथे डकवा. ( विषेशत: व्यक्तीचित्रे)
(८) काही अडचण येऊ नये, आलीच तर मी आहेच.
शरद
व्वा अतिशय उपयुक्त माहीति.
आजपासुनच धडाधड चित्रे तयार करायला सुर्वात कर्तो.
बादवे, फोटोशॉप विकत घ्यायचं का ते पन ढापायचं ?
इंट्रनेट्वर त्याचासारखि लयि सॉफ्ट्वेअर्स अव्हेलेबल आहेत.
+++++++++++++++++++१
खूप छान आहे .....काही बाही करुन पाहिले.....डकवते नंतर...
मस्त धागा