संदर्भ
प्रेमओले तप्त ओठ आज पुन:श्च थरारले
तू समोर ठाकताच फिरुनी शुष्क जाहले
तव लोचनी तरळताच रंग माझिया प्रितीचे
गालावरील गुलाब तुझिया बघ उमलू लागले
सात्विक चेहर्याशी ती लाली पाहून नयन सुखावले
क्षणी मनात माझिया तुळशी वृंदावन उमटून गेले
नजर भिडताच कस्तुरीगंधित काया किंचित थरारली
रुपसंपन्न मृगनयनी नवतारुण्य अवचित अवगुंठले
प्रयास तो अनुराग लपविण्याचा किती निष्फळ
नजर अन् मनातील द्वंद्व पहा लख्ख दिसू लागले
गुंतलो मी असा त्या लोभस मृगनयनी गुंत्यात
क्षणात कित्येक संदर्भ कोवळ्या प्रीतीस लाभले
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०८/०५/२०११)
💬 प्रतिसाद
(3)
प
प्रकाश१११
Mon, 05/09/2011 - 08:33
नवीन
छानच रे मित्रां !!
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Tue, 05/10/2011 - 22:36
नवीन
अरे बाबा दोन्ही कडे आग लागलेली आहे!
"सात्विक चेहर्याशी ती लाली पाहून नयन सुखावले
क्षणी मनात माझिया तुळशी वृंदावन उमटून गेले"
नक्की नक्की, अगदी वहीनीच आमच्या.
मस्त काव्य आहे मिका
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 05/11/2011 - 06:09
नवीन
मिका
आवडली ओ तुमची कविता...मस्त आहे.
- Log in or register to post comments