पाककृती
कैरीचे पाण्यातील लोणचे..
Primary tabs
साहित्यः
१.कैरी (१ किलो)
२.मोहरी(राई) दाळ (१/२ किलो)
३.हिन्ग (चविपुरते)
४.लाल तिखट : ४ मोठे चमचे.
५.हळद : २ मोठे चमचे.
६.तेल : १/२ किलो.
७. मिठ : १/२ किलो.
८.पाणी : ५ ते ६ वाट्या.
९.बडिशेप पुड: १ चमचा.
१०. धणे पुड : १ चमचा.
क्रुती:
१. प्रथम कैरिच्या फोडी करुन घ्याव्यात.
२.मिक्सर मधुन मोहरी डाळ कोरडी वाटुन घ्यावी.
३. एका पातेल्यात तेल घेवून कड्कडित गरम करावे.
४.एका मोठ्या परातित वाटलेली मोहरी डाळ व थोडे पाणी घेवुन हाताने खुप फेटावे.(जवळपास १० मिनीटे. )
५. आता फेटलेल्या मिश्रणात लाल तिखट,हळद ,हिन्ग ,बडिशेप पुड,धणे पुड व मिठ टाकावे व त्यात वरुन गरम तेल टाकावे जेणेकरुन सर्व साहित्य परातीतच तळले गेले पाहिजे.
६.सर्व साहित्य मोठ्या चमच्याने व्यवसथित हलवा.
७.आता कैरिच्या फोडी वरील मिश्रणात टाका व हलवा
८.थोडा वेळ झाकुन ठेवा.
९. आता उरलेले पाणी मिश्रणात टाका व हलवा.
१०. हे लोणचे २ दिवस मुरु द्या.
हे लोणचे वर्ष भर टिकते.
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
कोन लिहिनार आहे ?
मी लिहितो.
.
१० चपती बरोबर खाने
११ पुरि बरोबर खाने
१२ भाता बरोबर खाने
१३ शिर्या बरोबर खाने
१४ पोह्या बरोबर खाने
१५ तसेच खाने
१६ इडली बरोबर खाने
१७ डोस्या बरोबर खाने
१८ नान बरोबर खाने
१९ पराठ्या बरोबर खाने
अजुन पाहीजे काय ?
क्रमशः आहे ग....हे हे हे
सम्पादन करण्याचा प्रयत्न करत होतो.
पण काहितरी टेक्निकल प्रोब्लेम मुळे पा क्रु अपुर्ण प्रकाशित झाली.
असे झाले होय ?
मला वाटले कि तुम्ही लोणच्यात घालायचे पाणी आनाय्ला गेलात. ;)
फोटो कुठे आहे ????
फोटो धुवाय्ला टाक्ला असेल
हो लोणच्यात घालुन पाणी संपले ना.
आता उद्या नळाला पाणी आले कि लगेच धुणार, फोटु
अवो, मॅड्म, फोटो काय पान्याने धुवत नाय. ते एका स्पेसिफिक अॅसिडने धुतात. (ते नाही का अंगाला लावतात बघा सुरमा झाल्यावर)
स्वगत : ह्या इंटरनेट्वरील एकेकाचे अज्ञान कसे दुर करु रे देवा !!!!!!!!!!! ...........शक्ति दे.
जाहीर: ह्या इंटरनेट्वरील एकेकाला तो विनोद आहे हे ज्ञान कसे देवु रे देवा !!!!!!!!!!! ...........बुद्धी दे (त्यांना ) .
स्पेसिफिक रसायन वापरून फिल्म धुतल्यानंतर पुन्हा पाण्यात धुतात. यामुळे डेव्हलपिंगची क्रिया थांबते. फिल्म किती वेळ
डेव्हलपरमधे ठेवली आहे यावरून फोटोंचा कॉट्रास्ट ठरतो.
(अवांतरः भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत शिकवताना, फोटो डेव्हलपमेंट शिकायला मजा वाटली होती.)
अदिती
प्रयत्न पाण्यात गेले?
पुढच्या वेळेला बिन पान्याचे टाका. ;-)
नक्की टिकेल का वर्षभर....हे लोणचे..नाहीतर
>>>>>नक्की टिकेल का वर्षभर....हे लोणचे..नाहीतर
नाहीतर काय? अंड्याचं लोणचं करा की..... हाय काय आन नाय काय?
वर्षभर टिकेल का? हे तुम्ही लोणचे किती बनवता व किती प्रमाणात कितीवेळा खाता यावर अवलंबुन आहे.
चटकदार असेल तर वर्षभर टिकतंय का बघायला कोण शिल्लक ठेवेल...? ;)
वर्षभराने टिकून (उरून) राहणे हे लोणच्याचे यश नव्हे तर अपयश आहे.
....
छान पाकृ.. नवीनच प्रकार दिसतोय. पाण्याचे पूर्वी ऐकले नव्हते. उलट पाणी अजिबात लागता कामा नये याची पराकाष्ठा पाहिली होती.
टिकाऊ पदार्थ बनवताना पाणी हा शत्रू नं १ म्हणून माहीत होता.
हे लोणचे प्रामुख्याने कैरीचा हन्गाम सुरु होताबरोबर घातले जाते.
यातील कैरीचा आम्बट्पना व राइच्या डाळीची नाकामध्ये झणझण उठवणारी चव ही २ मुख्य घटके आहेत्.यामुळे लोणच्याला १ विशीष्ट चव येते.
हे लोणचे बरणीत भरुन ठेवावे आणि वरचेवर (साधारण दर १५ दिवसानी)हलवत रहावे म्हणजे वर्षभर टिकते.
आमची आजी हे लोणचे जेव्हा करायची तेव्हा आम्ही सारी भावन्डे त्यावर तुटून पडायची.त्रिकाळ आमचे खाणे या लोणच्याबरोबरच व्हायचे.त्यामुळे वर्षभर टिकण्याचा प्रश्न च येत नव्ह्ता. आणि झटपट तयार होत असल्यामुळे १का हन्गामात ३ ते ४ वेळेस लोणचे तयार होत असे.
ऊन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते...
हे लोणचे पावसाळ्यात टाकले तर चालेल का.......
च्यामारी हे कसले लोणचे ? पहिल्यांदाच वाचतोय !
(माईनमुळ्याचे लोणचे चाखणारा) :)