Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पु.ल. आणि अत्रे-एक दर्पण

अ — अत्रुप्त आत्मा, Mon, 05/09/2011 - 20:02
ह्या कवितेच वर्गिकरण मि हास्य रसात केलय,पण मुलत: तो असला नसला तरि फारसा फरक पडणार नाहि.कारण हास्यरस हा या दोन माणसान्च्या व्यकक्तित्वाचा अविभाज्य घटक होता.दर्पण हे या कवितेच न्निवळ नाव नसुन तो खरच या कवितेचाहि स्वभावधर्म आहे...हास्यवेदाचार्य-आचार्य अत्रे आणि हास्ययज्ञनारायण-पु.ल.देशपान्डे...यान्ना अर्पण... १)कधि कधि मि पु. ल.न्चा,कधि कधि मि अत्र्यान्चा.प्रश्न उरतो मधे फक्त वेलान्ट्या आणि मात्रान्चा२)पु.ल.म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या साथ आहे.अत्रे म्हणत भगवन्त ना,तो तुमच्या 'आत' आहे.३) म्हणजे पु.ल न्च खद्य हे,दहि आणि भात होते. तर अत्रे क्रुष्ण उपासक,ते गोपाळ काल्यात होते.४) त्या गोपाळाला काला सोडुन,,जगता कधि आलेच नाहि.तर हा गोपाळ मुळातच काल्यातला,त्याला काल्यानि सोडले नाहि.५)काला म्हणजे कला,कि कला म्हणजे काला?,जाउ दे ह्या कोड्याना,मि का करु कलकला?६)पु. लना विनोदाचि गोडि होति,तर अत्र्यान्ना खोडि होति.कहि का असेना शेवटि,एकच घोडागाडि होति७)पु.लना वाचक मिठि मारतात,तर अत्र्यान्ना घडतो सलाम.म्हणजे पुल ला(ई)फ बॉय साबण,तर अत्रे सणसणित हमाम.८)म्हणजे मि कुणाचा?दह्याचा कि हन्डिचा?अहो हे दोघ माझे,एरवि असतो कोण कुणाचा?९)विनोदाच्या कान्डिने,बसते कधि झुकान्डि.पण कधिच होत नाहि,वाट त्यान्चि एकान्गि १०)फटाक्यान्च्या माळाच या,सम्पल्या असे म्हणायचे.पण नाद दडलेले कनि,ते कसे सुटायचे?

प्रतिक्रिया द्या
5117 वाचन

💬 प्रतिसाद (16)
श
शुचि Mon, 05/09/2011 - 21:08 नवीन
ही घ्या शुद्ध लेखनात - _______________________ कधी कधी मी पु. लं.चा, कधी कधी मी अत्र्यांचा. प्रश्न उरतो मधे फक्त वेलांट्या आणि मात्रांचा||१|| पु.ल.म्हणत भगवंत ना, तो तुमच्या साथ आहे. अत्रे म्हणत भगवंत ना, तो तुमच्या 'आत' आहे.||२|| म्हणजे पु.लं च खाद्य हे, दही आणि भात होते. तर अत्रे कृष्ण उपासक, ते गोपाळ काल्यात होते.||३|| त्या गोपाळाला काला सोडुन, जगता कधी आलेच नाही. तर हा गोपाळ मुळातच काल्यातला, त्याला काल्यानी सोडले नाही||४||. काला म्हणजे कला, की कला म्हणजे काला?, जाउ दे ह्या कोड्याना, मी का करु कलकला?||५|| पु. लना विनोदाची गोडी होती, तर अत्र्यांना खोडी होती. काही का असेना शेवटी, एकच घोडागाडी होती||६|| पु.लना वाचक मिठी मारतात, तर अत्र्यान्ना घडतो सलाम. म्हणजे पुल ला(ई)फ बॉय साबण, तर अत्रे सणसणीत हमाम.||७|| म्हणजे मी कुणाचा? दह्याचा कि हंडीचा? अहो हे दोघ माझे, एरवी असतो कोण कुणाचा?||८|| विनोदाच्या कांडीने, बसते कधि झुकांडी. पण कधिच होत नाही, वाट त्यांची एकांगी ||९|| फटाक्यांच्या माळाच या, सम्पल्या असे म्हणायचे. पण नाद दडलेले कानी, ते कसे सुटायचे?||१०|| ____________________________________ धी (dhee) नी (nee) कां(kaM) सं (saM)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/10/2011 - 11:16 नवीन
पुनर्लेखना बद्दल धन्यवाद...ह्र्स्व पटकन कळत पण दीर्घ समजायला वेळ लागतो,हाही माझ्या नवीन कवितेचा विषय होउ शकतो...फक्त अनुस्वार कळत असुन वळत नव्हता,तोही कळला.आता फक्त ते एकाखाली एक ओळ कशी टाईप करायचि तेवढ कळल,कि झाल....आपण केलेल्या मदती बद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद...पराग दिवेकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/10/2011 - 11:22 नवीन
शुचि...पुर्न लेखनाबद्दल धन्यवाद...ह्र्स्व पटकन कळत पण दीर्घ समजायला वेळ लागतो,हाही माझ्या नवीन कवितेचा विषय होउ शकतो...फक्त अनुस्वार कळत असुन वळत नव्हता,तोही कळला.आता फक्त ते एकाखाली एक ओळ कशी टाईप करायचि तेवढ कळल,कि झाल....आपण केलेल्या मदती बद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद...पराग दिवेकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
प्राजु Mon, 05/09/2011 - 22:31 नवीन
मस्त कविता. शेवट खूप आवडला.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/10/2011 - 11:31 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/10/2011 - 11:31 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/10/2011 - 11:33 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/10/2011 - 21:47 नवीन
आपल्या कविता वाचल्या,अवडल्याहि...ईतर मराठि संकेतस्थळांचि माहिती मिळाली...बरे वाटले...माझ्या कवितेला दिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद...पराग दिवेकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मुलूखावेगळी Tue, 05/10/2011 - 07:00 नवीन
छान आहे कविता.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Tue, 05/10/2011 - 10:06 नवीन
प्राजु म्हणते तसं शेवट खुप आवडला :)
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Tue, 05/10/2011 - 10:27 नवीन
फटाक्यांच्या माळाच या, सम्पल्या असे म्हणायचे. पण नाद दडलेले कानी, ते कसे सुटायचे?| सुंदर......
  • Log in or register to post comments
A
ajay wankhede Tue, 05/10/2011 - 16:04 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 05/10/2011 - 18:08 नवीन
छान आहे कविता. पुलेशु
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 05/10/2011 - 20:12 नवीन
छान..... दोघेहि दैवते.. या वरुन एक विनोद आठवतो.. पु.ल च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते..भाषणात म्हणाले.. पु.ल. म्हनजे प्रचंड साहित्य निर्मिति.. व मागे वळुन त्यांच्या कडे बघत म्हणाले.. ज्याच्या नावातच..पु..व ल.. दोनहि आहेत तिथे निर्मितिला काय कमी...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 05/10/2011 - 22:33 नवीन
छान काव्य आहे.
  • Log in or register to post comments
द
दैत्य गुरुवार, 05/12/2011 - 21:20 नवीन
पराग, मस्त कविता! दोघांच्याही स्वभावातला फरक आणि लेखनातला फरक छानरित्या मांडला आहे!! पु.ल. आणि अत्रे ह्यांमधला फरक म्हणजे मला नेहेमी सँप्रास आणि आगासी किंवा शूमाकर आणि हॅकिनन मधे असणार्या फरकासारखा वाटतो! दोघेही तितकेच भारी पण दोघांची स्टाईल मात्र वेगळी!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा