Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्रोमियम प्लेटेड ढग

अ — अरुण मनोहर, Fri, 05/13/2011 - 07:44
कविता सुचली ही बातमी वाचून. क्रोमियम प्लेटेड ढग उंदराला सोडून धरतीवर, गेला नभात संगणेशक पीसीची कटकट कशाला, मेघातून गर्जणार निर्देषक दर तीन वर्षांनी व्हायचा घरचा संगणेशक म्हातारा लडखडती चाल बघून सगळ्यांचा चढायचा पारा मुन्नी नाचतांना हटकून संगणेशक व्हायचा जॅम आतातरी नविन आणा, आम्ही व्हायचो बदनाम अचानक येऊन कोठूनसे उंडारायचे व्हायरस त्यांचा ताप उतरवतांना अंगारात बुडायचा शांतरस मेंदू आपलाच वापरायचा सोडा संगणकी प्रघात रहाणार बृहस्पति आता क्रोमच्या रंगीत मेघात किचकट कामे सारी मेघात भले खालचा मजला मंद सुक्ष्म नरम विंडो गेटस म्युझीयममधे होतील बंद गुगलबाबा म्हणे क्रोम आला, हलतील सुत्रे सारी मेघातून आजोबा म्हणले तो तर कधीचाच नाचवतोय कळसुत्री भावल्या अंबरात बसून!

प्रतिक्रिया द्या
1815 वाचन

💬 प्रतिसाद (6)
न
नरेशकुमार Fri, 05/13/2011 - 09:08 नवीन
छान छान ! कविता अगदी ढगात नेउन पोहोचवली आहे.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 05/13/2011 - 15:45 नवीन
फस्स्कन हसू आलं कविता वाचून.. - पिंगू
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 05/13/2011 - 15:45 नवीन
फस्स्कन हसू आलं कविता वाचून.. - पिंगू
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 05/13/2011 - 23:22 नवीन
एकदम मस्त. नविन युगाची कवीता आहे अगदी.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 05/14/2011 - 02:14 नवीन
.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 05/14/2011 - 18:10 नवीन
हा हा, गमतीदार! शेवटचा ट्विस्ट छान.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा