वेडेपणा... (गझल)
काळीज माझे गुंतले अन भोवला वेडेपणा
'शहरात या तू एकटा!' म्हणला मला वेडेपणा
रात्री कुणी हाकारले ओळख मला ना लागली
मी बोललो 'तू कोण रे?' तो बोलला ' वेडेपणा!'
एकांत हा दःखी करे वणवण जिवाची ना टळे
आम्ही पुरे कंटाळलो कंटाळला वेडेपणा
माझ्या रथाला हाकता तू सोबती तू सारथी
ना माहिती आहेस तू माझ्यातला - वेडेपणा!
साकी विचारे सारखी 'आहेस का रे तू सुखी?'
ओलावल्या दुःखातुनी मी कोरला वेडेपणा
स्वप्नात माझ्या सारखा तो चंद्र येतो एकटा
माझ्या परी त्याच्या जगी आकारला वेडेपणा
- स्वानंद
प्रेरणा:
http://www.youtube.com/watch?v=qH5q-v8tvF4
💬 प्रतिसाद
(3)
न
नगरीनिरंजन
Wed, 05/18/2011 - 09:14
नवीन
छान!
एकांत हा दु:खी करे वणवण जिवाची ना टळे
आम्ही पुरे कंटाळलो कंटाळला वेडेपणा
ही द्विपदी मस्तच! दुवा न उघडताच प्रेरणा 'आवारगी' आहे ते कळले.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 05/19/2011 - 09:05
नवीन
ओलावल्या दुःखातुनी मी कोरला वेडेपणा
खुपच सही लिहिली आहे ही ओळ .. खुप आवडली.
इतर गझल अजुन उच्च हवी होती असे वाटले पण
लिहित रहा... वाचत आहे...
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 05/19/2011 - 18:39
नवीन
काही ठिकाणी मूळ काव्याबरहुकुम तर काही ठिकाणी स्वातंत्र्य घेऊन थोडी वेगळी रचना केली आहे. ते आवडलं.
वेडेपणा साठी थोडा अधिक तरल शब्द सापडला नाही का? मी हे विचारतोय कारण मलासुद्धा आवारगी साठी प्रतिशब्द सापडत नाहीये.
- Log in or register to post comments