मंत्रमुग्ध तळे
ललगा लगाल लगागा लगागा
असे काय होते तळ्याच्या किनारी
रुपेरी जला ये शशीची खुमारी
अशी पावसाने भिजूनी लव्हाळी
जळी भासे चिंब फ़ुलांची डहाळी
कुठे झाड गाते सुरांची तराणी
पवनात वाजे सुखाचीच गाणी
वसे आसमंति पऱ्यांची कहाणी
नसे थेंब आसु दुखांची विराणी
तळे ह्या सुखाने दुथाडी भरूनी
असे थेंब थेंबि मनी साठवूनी
जरि बैसलो हे अप्रुप बघूनी
तरि चित्त माझे उडाले फ़ुलूनी
असे काय होते तळ्याच्या किनारी
खुलल्या रुपेरी मनाच्या किनारी
येइ मोहरूनि उभारी थरारी
मन पाखरू नभि मारी भरारी
💬 प्रतिसाद
(3)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 05/18/2011 - 23:46
नवीन
खुप आवडली!!
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
Wed, 05/18/2011 - 23:51
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 05/19/2011 - 06:00
नवीन
मस्त कविता .. आवडली ..
जबरदस्त ओळी
- Log in or register to post comments