हे 'असं' कसं?
घट्ट विण
असलेली नातीही,
कधी ढिली पडतात...
कळवळतो, विव्हळतो जीव!
सतत शस्त्र खाली टाकून
'गरज' आहे, असं सांगण्याची
सवय आडवी येते!!
'आपलचं माणूस' आहे ना?
असा आवाज पुन्हा येतो...
मनाला समजावणं, की
भुलावणं?
वरच्यालाच ठाऊक....!
मग एक 'अस्फूटसं' हास्य,
मन हारल्याची आपली जाणिव...
अन्
जग जिंकल्याचा 'विजयी' भाव
त्याच्या चेहर्यावर.....
नाती अशी टिकतात का?
'एकाच्याच' गरजेखातर??
कळत नाही...
पण;
दरवेळी असंच घडतं खरं.......!!
💬 प्रतिसाद
(2)
ग
गणेशा
गुरुवार, 05/19/2011 - 08:40
नवीन
मुक्तक सुंदर ....
अवांतर :
"गरज ही नविन नात्याची जन्मदात्री असु शकते, परंतु नात्यामध्ये फक्त गरज उरली की समजावे नात्याचा अंत झाला आहे" - गणेशा
- Log in or register to post comments
व
वेणू
गुरुवार, 05/19/2011 - 22:48
नवीन
धन्यवाद आपले.....
"गरज ही नविन नात्याची जन्मदात्री असु शकते, परंतु नात्यामध्ये फक्त गरज उरली की समजावे नात्याचा अंत झाला आहे" -
ह्म्म्म! पटतयं!!
- Log in or register to post comments