Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयुष्य पार सरलेले

स — स्वानंद मारुलकर, गुरुवार, 05/19/2011 - 07:44
तडजोडी करता करता आयुष्य पार सरलेले स्वप्नांची वाफ उडाली कोरडे-शुष्क उरलेले आता न वळे पाऊल वाटेवरती गाण्यांच्या कंठात रुते आवाज ओठही बंद शिवलेले हे दुःख आत ना मावे बाहेर येतही नाही पाहून पोरकी स्वप्ने डोळ्यांशी डबडबलेले माझे मन मोठे कोडे सुटता न सुटे थोडेही बाहेर दिसे स्वच्छंदी आतूनी बुरसटलेले खांद्याला घेऊन ओझी मसणात रोजची वारी एकेका दगडा खाली एकेक स्वप्न पुरलेले - स्वानंद

प्रतिक्रिया द्या
1381 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ग
गणेशा गुरुवार, 05/19/2011 - 08:45 नवीन
कविता खुपच सहि लिहिलेली आहे
आता न वळे पाऊल वाटेवरती गाण्यांच्या कंठात रुते आवाज ओठही बंद शिवलेले
खुपच करुन भाव दर्सवित आहेत ओळी... "पोरकी स्वप्ने" हे शब्द विशेष आवडले... असेच लिहित रहा .. वाचत आहे
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/19/2011 - 11:50 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/19/2011 - 22:46 नवीन
अतीशय सुंदर...मनोवेधक...खरोखर व्यथा मांडलेली कविता.
  • Log in or register to post comments
च
चेतन Fri, 05/20/2011 - 01:05 नवीन
सुंदर रचना चेतन
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 05/20/2011 - 01:22 नवीन
मस्त रे! खांद्याला घेऊन ओझी मसणात रोजची वारी एकेका दगडा खाली एकेक स्वप्न पुरलेले हे तर कळस!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 05/20/2011 - 03:47 नवीन
खुप आवडली!!
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Fri, 05/20/2011 - 05:36 नवीन
खूप आवडली.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 05/20/2011 - 08:31 नवीन
काय रे ऑणसाईटला करमत नाही का? ;) कविता फारच अप्रतिम. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा