नखरा नाही इतका बरा
नखरा नाही इतका बरा
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून
नखरा नाही इतका बरा ठेव हातचं थोडं राखून ||धृ||
अगदी सकाळी इतकी सजली
नाही कसर तू ठेवली कसली
मोगर्याची फुले वेणीत माळली
सुगंधी मन माझे कसे ठेवू मी झाकून ||१||
कुणी रंभा म्हणू की अप्सरा स्वर्गाची
तूला बघताच होई तगमग जीवाची
दागदागीने घालून रस्त्याने चालली
मागे नको ग पाहू अशी मान वळवून ||२||
तुझ्या नजरेला माझी नजर भिडली
पिवळ्या केवडी रंगानं जादू केली
प्रित दोन जीवांची जुळू लागली
नको झुरवू आता दुर उभी राहून ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२०/०५/२०११
💬 प्रतिसाद
(9)
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/19/2011 - 22:52
नवीन
एकदम कडक...मोगय्राचा सीझन ऊन्हाळ्यात का येतो?...हे आज कळलं...
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Sun, 05/22/2011 - 07:04
नवीन
झकास लावणी!
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sun, 05/22/2011 - 07:20
नवीन
मोगरा फुलला !
- (मोगराधारी) टारझन
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Mon, 05/23/2011 - 04:46
नवीन
अजून येऊ द्या.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 05/23/2011 - 05:26
नवीन
लै भारी!
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Mon, 05/23/2011 - 09:23
नवीन
क्.ड्.क.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Tue, 09/06/2011 - 13:41
नवीन
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून...
दागदागीने घालून रस्त्याने चालली
मागे नको ग पाहू अशी मान वळवून ...
नको झुरवू आता दुर उभी राहून ....

- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Tue, 09/06/2011 - 13:41
नवीन
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून...
दागदागीने घालून रस्त्याने चालली
मागे नको ग पाहू अशी मान वळवून ...
नको झुरवू आता दुर उभी राहून ....

- Log in or register to post comments
ध
धन्या
Sat, 09/10/2011 - 09:43
नवीन
तिसरा फोटो पाहून अंमळ हळवा झालो.
ही अनुष्का नं? हिच्यावर पुर्वी खुप जणांचा जीव होता ;)
- Log in or register to post comments