Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डाल ग कोंबडी डाल

प — पाषाणभेद, Fri, 05/20/2011 - 18:46
डाल ग कोंबडी डाल
डाल ग कोंबडी डाल, तू लवकर कोंबडी डाल ग अंड खायाला मिळना म्हणून व्हत्यात लई हाल ग ||धृ|| चोच बारीक लाल लाल पिसं पळतीया कुठं, पकड निट हाती धरून आण तिला इथं नको करू तिच्या जिवाचे हालं ग डाल ग कोंबडी डाल तू लवकर कोंबडी डाल ग अंड खायाला मिळना म्हणून व्हत्यात लई हाल ग ||१|| तुरेवाल्या कोंबड्याला कोंबडी लई ग प्यारी दानं घाल दोघांना, झाली आपली न्याहारी पानी प्यायाला निर्मळ घाल पारातीत पोरासोरांना खेळू नको देवू तिथं एकांत मिळू दे दोघांना आता कुत्रं मांजर तू लांब हाकलं ग डाल ग कोंबडी डाल तू लवकर कोंबडी डाल ग ||२|| अंडी, चिकन, आक्खी कोंबडी बाजारात विकाया मी जाई त्याच्या मधूनच होई कमाई किराणामाल घरी घेवून येई तयार रहा, वाजलेका सहा ताट वाढून ठेव, मला लई भुक लागलं ग डाल ग कोंबडी डाल तू लवकर कोंबडी डाल ग ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २१/०५/२०११

प्रतिक्रिया द्या
1258 वाचन

💬 प्रतिसाद (3)
स
स्वानन्द Fri, 05/20/2011 - 20:17 नवीन
:) मजा आली.
  • Log in or register to post comments
न
नाना बेरके Sat, 05/21/2011 - 01:17 नवीन
तुमची हि कविता एखाद्या संगीतकाराला चाल लावायला द्या. "कोंबडी पळाली, तंगडी धरून" ..... पेक्षा ही कविता कितीतरी उजवी आहे.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 05/22/2011 - 06:56 नवीन
मस्त रस्सा!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा