Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भेळ

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 05/21/2011 - 03:13
==भेळ== तत्वांची मारामारी शब्दांचा खेळ,भावनेचा भडका व्यवहाराची भेळ॥ध्रु॥ घ्यायचे भरपुर चुरमुरे,वरुन फरसाणाचा भपका कांदा टोमेटो टाकुन,वरुन चिंच-पाण्याचा हबका डाव सरसरत फिरवुन दाखवायचा,पंचवीस रुपायाचा खेळ। गिह्राईक चांगलं हेरुन घ्यावं,मुठभर शेव पेरुन घ्यावं चव नसली तरी चमचा चकचकीत,म्हणुन थोडं सेलेड द्यावं डिश देण्याआधी पैसे घेऊन,तक्रारीला ठेऊ नये जागा आणि वेळ। आता ते दिवस ह्रायले नाही,गिह्राईक कमवायची तर बातच नाही कांदा अन गिह्राईकं कापायचीच असतात,अशी फिरवावी आपापल्यात वही फक्त न चुकता लक्ष्मीपुजनाला,पुजेत ठेवावी रोज-मेळ। चला...आजचा धंदा संपला, पाचशे...तिथं हजारचा गल्ला जमला भरपुर भरलं ना पोट...?,आत काही का असेना मामला..... नीतीमत्ता---?सांडलेल्या चुरमुय्रासारखी,लांबुन बघतीये खेळ। =०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०= पराग दिवेकर.......

प्रतिक्रिया द्या
2398 वाचन

💬 प्रतिसाद (5)
त
तिमा Sun, 05/22/2011 - 06:31 नवीन
कविता आवडली. नीतीमत्ता---?सांडलेल्या चुरमुय्रासारखी,लांबुन बघतीये खेळ। हे विशेष आवडले. आणि गिर्‍हाईकांची नीतिमत्ता वर्णन करायची तर ' मागून घेतलेल्या चुरमुर्‍यांसारखी ' असेही वर्णन करता येईल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 05/22/2011 - 19:19 नवीन
धन्यवाद...पराग दिवेकर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
अ
अरुण मनोहर Sun, 05/22/2011 - 06:50 नवीन
तिखट आहे. डोळे पाणावले
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 05/22/2011 - 19:20 नवीन
धन्यवाद...पराग दिवेकर....
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Mon, 05/23/2011 - 04:45 नवीन
अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा