Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रंग कवितेचे -

व — विदेश, Mon, 05/23/2011 - 07:34
पहिली माझी कविता हो प्रेयसीने वाचली - अर्धी लिहिली होती तरी अय्या कित्ती छान म्हणाली ! दुसरी माझी कविता हो आईने ती ' पाहिली ' - कौतुकाने सांभाळूनी पेटीतच ती ठेवली ! तिसरी माझी कविता हो बापाने वाच(व)ली - कागद मागे पुढे बघुन कोरी बाजू वर ठेवली ! चौथी माझी कविता हो दुसऱ्याने ती पाहिली - खो खो हसून तिसऱ्याकडून तीनशे मित्रात फिरवली ! पाचवी माझी कविता हो बायकोने वाचली - काही समजली नाही तिला रद्दीतच तिने घातली ! सहावी माझी कविता हो शेजाऱ्याने वाचली - नेहमीप्रमाणे 'जळून ' त्याने तुकडे करून भिरकावली ! सातवी माझी कविता हो टीकाकाराने चाळली - त्यालाही ना कळल्यामुळे 'सर्वोत्तम ' कविता ठरली !!

प्रतिक्रिया द्या
1062 वाचन

💬 प्रतिसाद (1)
अ
अरुण मनोहर Mon, 05/23/2011 - 09:18 नवीन
आठवी माझी कविता मिपावर आज टाकली पहा किती वाचकांनी भराभरा ती चाळली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा