Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी बोर्ड बोलतोय...

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 05/25/2011 - 15:10
मी बोर्ड बोलतोय बोर्ड,बरेच वर्षापुर्वी एका पुढाय्रा कडुन लागलेला...बोर्ड॥ध्रु॥ त्या दिवशी जोरदार सोहळा होता,रंगवलेला शिवाजी आणि शेजारी १मावळाही होता। हार तुरे पेढे अगदी काहिही कमी नव्हतं,पुढाय्राच्या पुढे उभी होती १फोर्डं॥ माझ्यावर काय लिहितात मजकुर,मला माहित नसतो काय?पण १दिवस उलटला की लीहीणारे म्हणतात बायबाय। जसा रंगाचा ब्रश असतो ना,......तसच यांचं मन कोरडं॥ मी दुकानाचा असलो ना,की वाईट वाटत नाही,पण संघटनेचा असलो ना,की खटकतं। बाजार संपताच उठुन जातात........ऊरतं मोकळं मार्केटयार्डं॥ परवाच एका कुत्र्यानी माझ्यावर शू केली,त्या निमित्तानी जमलेली धुळ जरातरी कमी झाली। तुम्हाला अईकताना खिन्नता वाटेल,........पण लांबुन हसत होतं १ थेरडं॥ अता मला ह्या चऊकात चांगली ५०वर्ष झालीयेत,मला रंगवलेल्यांची तर पोरंही कामाला आल्येत। त्यांच्यातल्याच एकानी चिकटवलं पर्वा...."पुढारी कसे व्हाल?"या कोर्सचं कार्ड॥ कसली समाजसुधारणा अन कसला आलाय मान?माझ्या खांबाचचं थुंकुन केलय पिकदान। पण पुढच्याच चऊकात दिसतो डोंबाय्राचा खेळ,२मिनिटात तो शिकवतो कशी जमवायची भेळ। ............................नव्यातलं नवं देतानाही वापरावं जुनं कार्डं॥ अता समाजसुधारणा कशी होईल याची मला चिंता नाहि,निरोप घेता घेता सांगतो मीही काही। एक दिवस भाषण अईकण्यापेक्षा.....रोज वाचा हे मनोगत फर्डं॥ पराग दिवेकर......

प्रतिक्रिया द्या
12616 वाचन

💬 प्रतिसाद (34)
ट
टारझन Wed, 05/25/2011 - 17:36 नवीन
वाह ! सहज ... सुंदर काव्य ... ह्या विषयावर असंही काही लिहीता येऊ शकेल हे आम्हा पामरांच्या स्वप्नीही नव्हतं.. पण पराग जी दिवेकर ... ह्यांनी काय किमया साधली आहे बघा ना .. खरं तर बोर्ड आपल्या रोजच्यापहाण्याला .. दिवसभर आपण त्याच्या आजुबाजुनं जातो , बर्‍याचदा बोर्ड तिथे असुनही तो आपल्यासाठी नसतोच मुळी .. त्याच्या मनी काय असतं ह्याचा कोणी विचार तरी करतं का ? त्याचं मन रुक्ष झालंय कोरडं झालंय ह्याची तुम्ही जी दखल घेतली आहे त्याबद्दल काय बोलु ? तसं पाहिलं तर बोर्ड ही एवढी इंपॉर्टंट गोष्ट नाही.. पण तुम्ही ज्या पद्धतीने जिवंत देखावा सादर केलाय , काय सांगावं .. आम्ही तर कर्जदार झालो तुमचे. कुत्र्याचं शु करणे , प्रसंगी शी करणे , त्याच बरोबर लोकांचंही पानं किंवा तमाखुगुटखे खाऊन पचापच थुंकणं .. काय वाटत असेल त्या बोर्डाला .. पण एक सांगुका ? हे शांतरसा ऐवजी करुणरसात असायला हवं .. कारण कविता वाचुन खाली येता येता माझ्या हृदयाला ज्या असह्य वेदना होऊ घातल्यात .. त्याने श्वास घेणं ही मुश्किल होऊन बसलंय .. किती बरं समरस झालात तुम्ही कविता लिहीताना .. मी आज पासुन तुमच्या कवितांचा चाहता आहे . एका आगळ्यावेगळ्या विषयावर एवढी टची कविता कशी लिहीतात हे पराग सर च जाणो. मला तुमच्या चहात्यांच्या यादीते एक स्थाण द्या प्लिज . खरंच .. मनापासुन आवडली कविता .. खुप खुप हृदयस्पर्षी .. कृपया पु.क.शु - पचाक थुंकेकर
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/28/2012 - 11:05 नवीन
प्र.का.टा.आ. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रचेतस Wed, 03/28/2012 - 12:28 नवीन
इतकं सुंदर काव्य, इतका सुंदर टार्‍याचा प्रतिसाद, त्याहूनही अधिक उदात्त तुमचा उपप्रतिसाद. प्रकाटाआ का हो केलंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
५
५० फक्त Wed, 03/28/2012 - 12:59 नवीन
आता या परत पेठेत बासुंदी प्यायला मग सांगतो, बासुंदी आहे का भांग घातलेली थडाई आहे ते कळायचं की नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/28/2012 - 13:16 नवीन
. <<< हम पहिले से तय्यार थे,कहिसे भी आओगे ये भी जानते थे :-p >>>>>>>>>>>>>>>>Image removed. @आता या परत पेठेत बासुंदी प्यायला मग सांगतो, बासुंदी आहे का भांग घातलेली थडाई आहे ते कळायचं की नाही. >>> ए ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका हेहे हे हे,ए ए ए ए... Image removed. ए ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका हेहे हे हे,ए ए ए ए... Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
ग
गोगोल Sat, 05/28/2011 - 02:57 नवीन
:):):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
माझीही शॅम्पेन Wed, 05/25/2011 - 17:49 नवीन
परवाच एका कुत्र्यानी माझ्यावर शू केली,त्या निमित्तानी जमलेली धुळ जरातरी कमी झाली। तुम्हाला अईकताना खिन्नता वाटेल,........पण लांबुन हसत होतं १ थेरडं॥
धन्य झालो तुझ्या काव्य-प्रतिभेने ! तुझ्याकडे कविता करण्याचा क्रश कोर्स असेल तरी नक्की सान्ग ! :) (फी तू देणार की मला द्यावी लागेल हेही सांग ) (सगळा प्रतिसाद हलका घेणे )
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 05/25/2011 - 19:53 नवीन
तुम्ही प्रतिसाद हलकेच घ्यायला सांगितलाय...तेंव्हा तुम्हाला कविता येण्याचा उपायही हलकाच देतो...वर मधेच टाकलेलं "हसरं" लिंबू असं काही लिहावसं वाटलं की हलकेच स्वतःच्या तोंडात पिळावं,आणि प्यावं देखिल...हा उपाय केल्यावर हलकं वाटलं तर नक्की कळवा...तिच फी आहे...तुम्ही द्यायची...आणि हो,ते एक ह्रायलं...कवीला नको तिथे क्रश करु नका...म्हणजे तुमचा कोर्स आपोआप सुरु होईल...हलकेच...नाही का?
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 06/18/2012 - 20:14 नवीन
बुवा हे तुमचे मत आहे??? डोळे पाणावले हे वाचून. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ब
बॅटमॅन Mon, 06/18/2012 - 21:06 नवीन
माझेपण ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
प्रचेतस Tue, 06/19/2012 - 05:41 नवीन
आणि माझेपण. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अरुण मनोहर Wed, 05/25/2011 - 22:41 नवीन
पापड तुम्ही कुरकुरीत लिहीत जा, आम्ही कुरकुर न करता वाचत जाऊ. -कोर्ड
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/26/2011 - 09:36 नवीन
तुम्ही कीत्ती कुरकुरीत प्रतिसाद दिलात...वाहव्वा...छान...धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
ग
गणेशा गुरुवार, 05/26/2011 - 10:46 नवीन
विषय छान... मात्र कमी शब्दात जास्त आशय येवुद्या... लिहित रहा... वाचत आहे
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 05/26/2011 - 11:17 नवीन
.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 03/28/2012 - 12:49 नवीन
मला वाटलं एस एस सी बोर्डाची , झालंच तर एमेसीबी बोर्डाची व्यथा बिथा आहे का काय ? प्रतिभा दाट आहे. मस्त भन्नाट क्लास वर दोन विषय सुचविले आहेत . येउ द्या येत रहा
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 03/28/2012 - 13:07 नवीन
@झालंच तर एमेसीबी बोर्डाची व्यथा बिथा आहे का काय ? >>> तुम्ही कशाला व्यथाबिथा बघत बसताय,तुम्ही आपले...प्रति-साद-उप-प्रतिसाद खेळत बसा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Wed, 03/28/2012 - 16:05 नवीन
आयला, ईनजान झालं म्हून डब्याला येवडं खाली पघायचं ? आन परतिसादाचा डबा नसल तर इंजानला इचारतो कोन म्हंतो म्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
व
वपाडाव Wed, 03/28/2012 - 13:23 नवीन
धागा ज्या कारणासाठी बोर्डावर वर आणलाय ते काही साध्य होताना दिसत नाही.... -(खिन्न) वपाडाव
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 03/28/2012 - 13:49 नवीन
आता फक्त वेळ आली आहे काळ नाहि, खिन्न नका होउ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
स
सांजसंध्या Wed, 03/28/2012 - 15:35 नवीन
ही कविता पराग दिवेकरांची आहे का ? या अशा विषयावर चांगलंच लिहीलंय कि..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 03/28/2012 - 16:46 नवीन
हो. हो . तेच ते पराग दिवेकर. सध्या अत्रुप्त आत्म्यामध्ये रूपांतरित झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या
स
सोत्रि Wed, 03/28/2012 - 16:31 नवीन
परवाच एका कुत्र्यानी माझ्यावर शू केली, त्या निमित्तानी जमलेली धुळ जरातरी कमी झाली।
वारलो हे वाचून! बोर्डावरची धूळ कमी झाली....आग्ग्गागागागा... किती भला थोरला कुत्रा असावा ह्याचा विचार करता करता गतप्राण झालो :D टार्‍यालाही ह्या निमित्ताने दंडवत! - (जिलब्या रिचवणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 03/28/2012 - 16:45 नवीन
धूळ कमी होत नाय हो, उलट ओघळावर नवीन धूळ बसून अजूनच ब्येक्कार दिसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
म
मुक्ती Mon, 06/18/2012 - 19:08 नवीन
आत्मारामपंत, तुम्ही अशा सामाजिक आशयाच्या कविता लिहीत चला हो. ती मेली विडंबनं लिहिता आणि नवकवी बिचारे पळत सुटतात मग!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/18/2012 - 19:50 नवीन
ठिक आहे... --^--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्ती
५
५० फक्त Tue, 06/19/2012 - 06:54 नवीन
कितव्यांदा वर आला म्हणायचा हा बोर्ड ? अतिक्रमणवाले पुढच्या गल्लीत गेले की लगेच वर येतो.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 06/19/2012 - 07:33 नवीन
अहो बोर्डच तो, मधून मधून बाणेदारपणा दाखवत वर येणारच की तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
ब
बॅटमॅन Fri, 06/22/2012 - 16:55 नवीन
आपली बोली, आपला बाणा....कसे वल्लीशेठ? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 06/22/2012 - 18:13 नवीन
मग काय तर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्पा Tue, 06/19/2012 - 07:49 नवीन
:)
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 06/22/2012 - 06:10 नवीन
"लवासा" सारखे "अ भय " असल्याने तो कायम वर येत राहील.... तसा "साहेबांचा" आदेश च आहे....
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 06/22/2012 - 06:19 नवीन
बोर्डावर लै धुळ झालिये काय तरी करा राव ;) :D
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 06/22/2012 - 11:18 नवीन
बालिके... तू बोर्डाशी खेळ Image removed. म्हणजे धूळ कमी होइल... Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा