Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अर्धसत्य..

व — विसोबा खेचर, गुरुवार, 05/26/2011 - 13:40
मूळ कविता - दिलिप चित्रे अनुवाद - तात्या अभ्यंकर. अर्ध सत्य.. चक्रव्युहात घुसण्यापूर्वी कोण होतो मी, कसा़ होतो हे मला माहीत नसेल.. चक्रव्युहात घुसल्यानंतर माझ्या आणि चक्रव्युहादरम्यान फक्त एक जवळीक होती जीवघेणी - हे मला कळणारच नाही चक्रव्युहातून बाहेर पडल्यावर भले ही मी मुक्त होईन.. तरीही चक्रव्युहाच्या रचनेत काहीच फरक पडणार नाही.. मरू की मारू? मारला जाईन की जीव घेईन? याचा कधी निर्णयच होणार नाही.. झोपलेला मनुष्य जेव्हा झोपेतून उठून चालायला लागतो, तेव्हा त्याला स्वप्नांचा संसार दुसर्‍यांदा कधीच दिसणार नाही.. निर्णयाच्या त्या प्रकाशात सर्व काही सारखं असेल का? एका पारड्यात नपुंसकता आणि एका पारड्यात पौरुष आणि तराजुच्या काट्यावर मधोमध, अर्धसत्य..!

प्रतिक्रिया द्या
5050 वाचन

💬 प्रतिसाद (8)
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/26/2011 - 14:13 नवीन
मूळ कवितेचे कवि म्हणून चित्रेंचे नाव दिसते आहे. मूळ कविता कोणत्या भाषेत आहे? कारण ज्याअर्थी अनुवादकाचे नाव आहे त्या अर्थी मूळ कविता मराठीत नाही. असो. छान कविता आहे. समोर आणल्याबद्दल तात्याचे आभार.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/26/2011 - 15:11 नवीन
आणि इथे चित्रपटातील मुळ दृष्य बघता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/26/2011 - 14:23 नवीन
तात्या, अनुवादित कविता आवडली अजून येऊ दे........! (मूळ कविता दिली असती तर जाणकारांनी काही भर घातली असती किंवा काही उणिवा सांगितल्या असत्या असे वाटले) -दिलीप बिरुटे (तात्याच्या लेखनाचा फ्यान)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 05/26/2011 - 16:03 नवीन
सहमत आहे. अनुवाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मूकवाचक Fri, 05/27/2011 - 17:52 नवीन
अजुन येउ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विसोबा खेचर Fri, 05/27/2011 - 05:44 नवीन
सर्वांचे आभार.. :) (किंचित कवी) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 05/27/2011 - 08:13 नवीन
आपले मनःपूर्वक आभार इतकी सुंदर रचना, अनुवादीत करुन आम्हाला वाचायला दिल्याबद्दल!!
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Sat, 05/28/2011 - 02:34 नवीन
नेहमीच्या लेखांपेक्षा वेगळाच लेख..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा