पाककृती

कच्चे मुर्ग की बिर्याणी

Primary tabs

मास्टरशेफ संजीव कपूर ह्यांच्या खाना खजाना मध्ये ही पा़कृ पाहीली होती , तीच करुन बघीतली आणी इथे देत आहे :) साहित्य चिकन मुरवण्यासाठी: १/२ किलो साफ करून तुकडे केलेले चिकन २-३ टेस्पून आले+लसुण पेस्ट २ कप दही १ कप तळलेला कुरकुरीत कांदा १/२ कप बारीक चिरलेला पुदीना १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून वेलचीपूड २ टीस्पून लाल तिखट १ १/२ टीस्पून गरम मसाला १ टेस्पून लिंबाचा रस १ हिरवी मिर्ची चिरून मीठ चवीनुसार १-२ टेस्पून तुप Image removed. भातासाठी साहित्यः २ कप बासमती तांदुळ ३-४ तमालपत्र ४-५ लवंगा ४-५ काळीमिरी २ मसाला वेलची २-३ हिरवी वेलची ३-४ दालचिनी १ टीस्पून शहाजिरे मीठ चवीप्रमाणे (चिकनला की लावले आहे त्याअंदाजानुसार घालावे) इतर साहित्यः १/२ कप दुधात केशर मिसळलेले २ टेस्पून तुप थोडासा तळलेला कुरकुरीत कांदा थोडासा चिरलेला पुदीना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कणीक पाकृ: चिकनला मॅरीनेट करण्यासाठी जे साहित्य सांगितले ते सर्व लावून चिकन ४-५ तास चांगले मुरु द्यावे. Image removed. २ कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून कोमट पाण्यात २० मिनिटे भिजवणे. एका स्वच्छ रुमालात शहाजिरे सोडून वरील अख्खा गरम-मसाला बांधुन , बत्त्याने एक-दोनदा कुटून घेणे. Image removed. Image removed. नंतर ४ कप पाणी उकळ्ण्यास ठेवून त्यात मीठ, शहाजिरे व बांधलेली पुरचुंडे घालून भात अर्धवट शिजवून घेणे .(७०-८०% शिजवणे) शिजवलेला भात ताटात काढून गार होऊ द्यावा. एका नॉन-स्टीक भांड्याला तुपाचा हात फिरवून घेणे. Image removed. त्यावर मुरलेले चिकन सर्वत्र पसरवणे. Image removed. त्यावर अर्धवट शिजवलेला भाताचा थर लावणे. Image removed. त्यावर तळलेला कांदा, चिरलेला पुदीना, चिरलेली कोथिंबीर, किंचित गरम-मसाला, किंचित वेलचीपूड भुरभुरणे. Image removed. परत त्यावर अर्धवट शिजवलेला भाताचा थर लावणे व त्यावर चिरलेला पुदीना, चिरलेली कोथिंबीर, किंचित गरम-मसाला, किंचित वेलचीपूड भुरभुरणे. त्यावर केशर मिश्रीत दुध घालणे, तुप सोडणे. Image removed. झाकण ठेवणे, झाकणाची कडा कण्केने व्यवस्थीत बंद करून ,भांडे तव्यावर ठेवावे. Image removed. १५ मिनिटे मध्यम आचेवर शिजु द्यावे व १५-२० मिनिटे मंद आचेवर शिजु द्यावे.मंद आचेवर शिजवले की चिकन चांगले शिजते. आवडत्या रायत्यासोबत गरम-गरम सर्व्ह करणे. Image removed.
गोगोल

फारच सुरेख दिसत आहे.

nishant

फोटो बघुन तोनडाला पाणी सुट्ले :)

रश्मि दाते

याला म्हणतात असली बीर्याणि,मस्त दिसत आहे,पण घरी सगळे डायट वर आहेत,:(

नगरीनिरंजन

+१
पण सांगितलेले प्रमाण एकाच माणसासाठीचे वाटतेय. :-)

खादाड

मस्त !! :) चिकनचे तुकडे जर मोठे असले तर मला जास्त आवडतं ! बाकी पा.क्रु. झकास!!

नीलकांत

खुप सुंदर झाली आहे बिर्याणी. बिर्याणी म्हणजे माझा खुप आवडता पदार्थ आहे. :)

छान , चवदार पाककृतीसाठी धन्यवाद.

- नीलकांत

मालोजीराव

खल्लास ........या विकांताला करणारच !
शोल्लीड धन्यवाद....पाकृ दिल्याबद्दल

ajay wankhede

छान , चवदार पाककृतीसाठी
धन्यवाद.